यावल दि.२८
आज बुधवार दि.२८ फेब्रुवारी २०२४ रोजी म्हणजेच राष्ट्रीय विज्ञान दिन निमित्ताने यावल येथील सरदार वल्लभभाई पटेल स्कूल मध्ये विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सरदार वल्लभभाई पटेल स्कूल मध्ये विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भुसावळ येथील शाहरुख खान सर प्रामुख्याने उपस्थित होते.सर्वप्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.शिला तायडे मॅडम यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन शाहरुख खान सर यांचा सत्कार करण्यात आला व सरांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
शाहरुख खान सर यांनी विद्यार्थ्यांना विज्ञानाचे महत्त्व समजावून सांगितले.इयत्ता ५ वी ते ९ वीतील विद्यार्थ्यांनी अत्यंत कुशलतेने विविध प्रयोगाचे प्रात्यक्षिक करून दाखवले.विद्यार्थी प्रात्यक्षिक करताना अत्यंत उत्साहीत होते
तसेच प्रत्येक प्रयोगासाठी अत्यंत परिश्रम घेतलेले दिसून आले.त्यांची कार्य कुशलता खरोखरच कौतुकास्पद होती तसेच या विज्ञान प्रदर्शनाने विद्यार्थ्यांच्या ज्ञानात विशेष भर पडली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फर्जेद खान सर यांनी केले.
अशाप्रकारे विज्ञान दिन अत्यंत उत्साहात व आनंदात पार पडला.संस्था अध्यक्ष राजेंद्र महाजन सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत फेगडे सर व सर्व शिक्षकवृंद व कर्मचारी वर्ग यांचे या कार्यक्रमास विशेष सहाय्य लाभले.
टिप्पणी पोस्ट करा