यावल दि.३
येथील सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आज बुधवार दि. ३ रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली
सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका सौ . शिला तायडे मॅडम यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला.शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्रावरील माहिती सांगून सुंदर असे भाषण सादर केले.संस्था अध्यक्ष राजेंद्र महाजन सर यांच्या मार्गदर्शनाखाली
आजचा कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती भोईटे मॅडम यांनी केले.प्रशांत फेगडे सर यांच्यासह सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी वर्ग या कार्यक्रमास उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा