यावल येथे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये गणतंत्र दिवस मोठा उत्साहात साजरा.


यावल दि.२६ यावल येथील सरदार वल्लभभाई इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये २६ जानेवारी गणतंत्र दिवस शाळेचे संचालक शशिकांत फेगडे आणि प्रमुख मान्यवर माया तडवी यांच्या शुभहस्ते राष्ट्रध्वजाची पूजन करून झेंडावंद करण्यात आले.
        दि.२६ जानेवारी २०२४ म्हणजेच भारताचा  ७६ वा गणतंत्र दिवस.या निमित्ताने आज सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये राष्ट्रध्वज फडकावण्यात आला.प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे डायरेक्टर शशिकांत फेगडे,माया तडवी यांना आमंत्रित करण्यात आले. सर्वात प्रथम प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे पूजन करून ध्वज फडकावण्यात आला व राष्ट्रगीत म्हणण्यात आले.या प्रसंगी तंबाखू मुक्तीची प्रतिज्ञा घेण्यात आली.तद्नंतर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शिला तायडे मॅडम यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले व नंतर कार्यक्रमास सुरुवात झाली.कार्यक्रमात सर्वच विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता व अत्यंत सुंदर असे देशभक्तीपर गीत गाऊन तसेच सर्व भारतीय नेत्यांच्या भूमिका साकारून आजचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात व जल्लोषात पार पाडला.संस्था अध्यक्ष राजेंद्र महाजन सर यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा 
कार्यक्रम पार पडला.प्रशांत फेगडे सर यांच्यासह सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी वर्ग या कार्यक्रमास उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती भोईटे मॅडम यांनी केले .

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात