यावल दि.२५
भडगावस्थित मास्टरलाईन लुब्रीकंट प्रा.लि.मध्ये २२ व २३ जानेवारी रोजी सेल्स टीमची वार्षिक आढावा बैठक अत्यंत उत्साहपूर्व वातावरणात पार पडली. २ दिवशीय सत्रात झालेल्या या आढावा बैठकीत २०२३ चा वार्षिक आढावा घेण्यात आला.संचालक मंडळाने विविध विषयांवर मार्गदर्शन केले.कंपनीच्या व्यवस्थापकांनी सेल्ससह सर्व कर्मचारी वर्गाला विविध टीप्स दिल्यात.कंपनीच्या कॉन्फरंस हॉलमध्ये आयोजित सेल्स आढावा बैठकीत प्रथम सत्राला संचालक समीर जैन, प्रशासकीय व्यवस्थापक मनोज महाजन यांच्यासह सेल्स टीम मधील एरिया मॅनेजर शिलज पांडे,एचओ रमजान पटेल, ज्ञानेश्वर गोसावी,आकाश हलकुदे,संदीप चांभारे, निंबराज विसपुते उपस्थित होते.यावेळी समीर जैन यांनी आढावा बैठकीत अजेंड्याच्या विषयावर मार्गदर्शन
केले.प्रथम सत्रात सकाळ व दुपार अशा दोन टप्यात कामकाज झाले.
सकारात्मक दृष्टीकोन ठेवून काम केल्यास यश निश्चित : समीरभाऊ जैन -आपली दैनंदिन कामाची पध्दत कशी असावी,आपण काय केल्याने सकारात्मक वाटचाल करू शकतो,मार्केट रिसर्च, मॅकेनिक पॉईंट,विविध प्रॉडक्टची उच्च गुणवत्ता,सेल्स प्रतिनिधीचा एरिया,लिडरशिप, प्रोफेशनल जीवन व वैयक्तिक जीवन,वर्तमान काळात जगणं, नेहमी सकारात्मक राहणं, जीवनातील मार्गदर्शक, शारिरीक आरोग्य आदी विषयांबाबत त्यांनी सखोल मार्गदर्शन करीत जीवनात नेहमी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून काम केल्यास यश निश्चित असल्याचे समीरभाऊ जैन म्हणाले.
संचालक सुयोगभाऊ जैन यांच्याकडून मास्टरलाईन टायर्स व टेक्निकल बाबींवर मार्गदर्शन ऑईल पाठोपाठ आता मास्टरलाईन टायर्स सुद्धा बाजारपेठेत दाखल झाले असून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.यात प्रामुख्याने ट्रॅक्टर व ट्रॉलीचे सर्व टायर्स, ट्रक,थ्रीव्हीलर टायर्स असून येत्या दिवसात विविध ट्यूब सुद्धा मार्केट मध्ये आणणार आहोत.ऑईल व टायर्स एकमेकांना परस्पर पूरक व्यवसायाने डिस्ट्रिब्युटर आणि ग्राहकांचा यास चांगला प्रतिसाद मिळत आहे.दरम्यान, सुयोगभाऊंनी टेक्निकल बाबींवर प्रकाश टाकत सेल्स प्रतिनिधींना मार्गदर्शन केले.यासह प्रतिनिधींच्या शंकांचे निरसन केले.
सेल्स प्रतिनिधींकडून मार्केटमधील अनुभव कथन- मार्केट मध्ये दैनंदिन काम करीत असतांना सेल्स प्रतिनिधींना चांगला व वाईट असा दोन्ही प्रकारचा अनुभव येत असतो.बऱ्याच गोष्टी शिकायला सुद्धा मिळतअसतात.डिस्ट्रिब्युटर,
मेकॅनिकल यांनाही अडचणी येतात. तेव्हा त्या कशा सोडवाव्यात. असा बराच अनुभव सेल्स प्रतिनिधींनी एकमेकांना सांगितला.
टिप्पणी पोस्ट करा