यावल दि.२४
नाशिक विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयातील जी.जी.बलसाणे यांची जळगाव येथे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था जळगाव या रिक्त पदावर नियुक्ती करण्यात येत असल्याचे महाराष्ट्र शासनाचे कार्यासन अधिकारी अनिल चौधरी यांनी आज बुधवार दि.२४ जानेवारी २०२४ रोजी आदेश काढून तात्काळ रुजू होण्याचे नमूद केले आहे सदरचा आदेश हा महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने काढल्याचे सुद्धा नमूद केले आहे.
आदेशाच्या प्रती माहितीस्तव
१) सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे. २) साखर आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे.३) पणन संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे. ४) आयुक्त, वस्त्रोद्योग, वस्त्रोद्योग संचालनालय, नागपूर. ५) सर्व विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था (प्रशासन व लेखापरिक्षण), व्दारा सहकार आयुक्त यांना देण्यात आल्या आहेत.
टिप्पणी पोस्ट करा