यावल दि. 13
यावल येथील व्यास शिक्षण मंडळ संचलित जे.टी.महाजन इंग्लिश स्कूल यावल मध्ये राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त जे. टी.महाजन इंग्लिश स्कूल मध्ये शैक्षणिक,सांस्कृतिक कार्यक्रमाचे क्रार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेच्या प्राचार्य रंजना महाजन मॅडम होत्या त्यांनी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन केले तर इंग्लिश मिडीयम प्राचार्य डॉ.किरण खेट्टे सर यांनी स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. स्कूल मधील शिक्षक वृंदांनी विद्यार्थ्यांना राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील महान कार्याची माहिती दिली व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले अशा प्रकारे मोठ्या उत्साहात राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली.
टिप्पणी पोस्ट करा