यावल दि.११
यावल नगरपरिषद कार्यालय अधीक्षक म्हणून सौ.आरती खाडे यांनी आज गुरुवार दि.११ जानेवारी २०२४ रोजी पदभार स्वीकारला.
आज दि.११ जानेवारी २०२४ रोजी दुपारी यावल नगर परिषद कार्यालयात कार्यालयीन अधीक्षक म्हणून सौ.आरती खाडे यांनी आपल्या पदाचा कार्यभार त्यांच्याकडे घेतला प्रत्येक विभागाची माहिती करून घेतली,त्यावेळी यावल नगरपरिषद सर्व विभागातील कर्मचाऱ्यांनी त्यांचे मनपूर्वक स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावल नगरपरिषद कार्यालयीन कामकाज करताना वेळेला महत्व देऊन चुकीच्या कामांना थारा दिला जाणार नाही,कार्यालयीन कामकाज वेळेवर आणि बिनचूक कसे होईल याबाबत विशेष लक्ष दिले जाणार असल्याची तसेच सातारा जिल्ह्यातून पाटण नगरपंचायत येथील सुद्धा त्यांना कार्यालयीन अधीक्षक पदाचा अनुभव असल्याने यावल नगरपरिषद कार्यालयीन कामकाजाला आता गती मिळणार आहे.अशी माहिती त्यांनी दिली.
टिप्पणी पोस्ट करा