गाव कामगार पोलीस पाटील संघ यावल तालुकाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील तर उपाध्यक्षपदी विशाल जवरे.

यावल दि.१
यावल येथील जिनिंग प्रेस खरेदी विक्री संघाच्या सभागृहात सालाबादप्रमाणे दि.१ जानेवारी २०२४ रोजी ठीक १० वाजता गावकामगार पोलीस पाटील संघाचे राज्यउपाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांच्या अध्यक्षतेखाली तालुका गावकामगार पोलीस पाटील संघाची बैठक संपुर्ण खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.यावेळी तालुका कार्यकारणीची घोषणा पोलीस पाटील संघाचे राज्यउपाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांनी केली, पोलीस पाटील यावल तालुका संघटना तालुकाध्यक्षपदी विरावली येथील चंद्रकांत पाटील पिळोदा बु. येथील उपाध्यक्षपदी विशाल जवरे  सचिवपदी राजरत्न आढाळे डोंगरकठोरा,तालुका संघटकपदी हरीश चौधरी, पिंपरुळ, तालुका कार्याध्यक्ष पंकज बडगुजर सावखेडासीम,
महिला तालुका उपाध्यक्षपदी सौ.रेखाताई सोनवणे किनगाव,प्रसिद्धीप्रमुखपदी चंदन पाटील सातोद,जेष्ठ मार्गदर्शकपदी मनोज देशमुख नायगाव, व प्रवीण पाटील कासारखेडा, सदस्यपदी,दिनेश बाविस्कर हिंगोणा,कु.मुक्ताताई गोसावी राजोरा,सौ.सरिताताई तडवी मालोद,
किरण पाटील बोरावल,प्रमोद तावडे निमगाव,
महेमुद तडवी परसाडे,राकेश साठे चिंचोली यांची सर्वानुमते निवड करण्यात आली,तसेच या बैठकीत जिल्हापदाधिकारी म्हणून सौ.माधुरीताई राजपूत बोराळे व पंकज वारके यांची निवड राज्यउपाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांच्या उपस्थितीत करण्यात आली,यावेळी बैठकीला जिल्हा कार्याध्यक्ष अशोक पाटील गिरडगाव, जिल्हाउपाध्यक्ष पवन चौधरी, अट्रावल,
जिल्हासंघटक सुरेश खैरनार पाडळसा व सौ.प्रफुल्लाताई चौधरी म्हैसवाडी,जेष्ठ पोलीस पाटील दिलीप पाटील सांगवी बु।,प्रसन्नकुमार पाटील हंबर्डी,सौ.नसीमाताई तडवी इचखेडा,उमेश पाटील डोणगाव,संतोष सुरवाडे करंजी,सौ.शारदा महाजन टाकरखेडा,दीपक पाटील कोळवद,विठ्ठल कोळी दगडी,अर्चना पाटील पिळोदा खु।,सुनील बारेला वाघझिरा,लक्ष्मण लोखंडे भालोद,विकास बोदडे वढोदा प्र सावदा,चेतन सोनवणे वढोदा प्र.यावल उपस्थित होते, नवनिर्वाचित तालुका संघटनेचे अध्यक्ष,उपाध्यक्ष,सचिव तसेच सर्व नवीन कार्यकारिणी सदस्य यांची निवड झाल्याबद्दल सर्वांचे स्वागत व नवीनच निवड झालेले पोलीस पाटील बंधू आणि भगिनींचा सत्कार समारंभ बैठकीत संपन्न झाला.याप्रसंगी सभेचे प्रस्ताविक संघटनेचे जिल्हाउपाध्यक्ष पवन चौधरी यांनी केले तर सभेचे सूत्रसंचालन संघटनेचे तालुका सचिव राजरत्न आढाळे यांनी केले.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात