अवैध वाळू वाहतूकदाराची दादागिरी आणि दबंगिरी. तलाठी डंपरवर असताना चालू गाडीतून चालकाने उडी मारून केले पलायन. मोठी अप्रिय घटना टळली.आज रात्री दीड वाजेची घटना.

यावल दि. 30
आज शनिवार दि. 30 डिसेंबर रोजी रात्री दीड वाजेच्या सुमारास चोपडा यावल रोडवर यावल येथे फैजपुरकडे जाणारे अवैध वाळू वाहतूक डंपर यावल तहसीलदार सौ.मोहन माला नाझीरकर यांच्यासह सर्कल,तलाठी महसूल पथकाने पकडले असता डंपरवर तलाठी चढलेले असताना चालू डंपर वाहनातून डंपर चालकाने उडी मारून फरार झाला.यामुळे मोठी अप्रिय घटना टळली आहे यामुळे महसूल पथकात मोठी खळबळ उडाली.
         याबाबत सविस्तर माहिती अशी की यावल येथे चोपडा रोडवरील हतनूर कॉलनी जवळ उतारावर पिवळ्या रंगाचे अवैध वाळू वाहतुकीचे डंपर महसूल पथकाने पकडले असता ते डंपर तहसील कार्यालयात घेऊन जाताना फैजपूर तलाठी तेजस पाटील हे डंपरवर चढलेले होते,चालू डंपर मधून बाविस्कर नामक चालकाने सिनेमा स्टाईल उडी मारून फरार झाला.चालू डंपर मधून उडी मारल्याने डंपरवर तलाठी तेजस पाटील असताना तसेच डंपरचा अपघात होऊ नये म्हणून तेथे उपस्थित भालोद येथील तलाठी भरत वानखेडे यांनी तात्काळ डंपरवर चढून डंपरला ब्रेक लावला त्यामुळे पुढील अपघाताची व जीवित हानीची अप्रिय घटना टळली.
अवैध वाळू वाहतूक वाहने पकडण्याच्या पथकामध्ये तहसीलदार सौ.मोहनमाला नाझीकर या स्वतः तसेच सावखेडा मंडळ अधिकारी अतुल बडगुजर,भालोद मंडळ अधिकारी मिलिंद देवरे,यावल तलाठी ईश्वर कोळी,कठोरा येथील तलाठी वसीम तडवी, यावल येथील कोतवाल निलेश गायकवाड,कठोरा येथील कोतवाल विजय अडकमोल, विरावली येथील कोतवाल पंढरीनाथ अडकमोल इत्यादी होते.
          समय सूचकता बाळगून रोडवर कमी वेगात असलेल्या डंपरवर भालोद येथील तलाठी भरत वानखेडे यांनी तात्काळ चढून ब्रेक लावल्याने मोठी अप्रिय घटना व अपघात टळला,त्यानंतर यावल कोतवाल निलेश गायकवाड यांनी सदरचे डंपर पुढील कार्यवाहीसाठी यावल तहसील कार्यालयात जमा केले आहे. डंपर मध्ये बेकायदा अनधिकृत विनापरवाना 2 ब्रास वाळू आढळून आल्याने पुढील दंडात्मक कारवाई लवकरच केली जाणार असल्याची माहिती मिळाली.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात