यावल दि. 25
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकल्प केल्यानुसार रावेर लोकसभा मतदारसंघात यावल तालुक्यातील दिव्यांग बांधवांना भारत सरकार सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग द्वारा एडीआयपी योजनेअंतर्गत खासदार रक्षाताई खडसे यांच्या हस्ते कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने वाटप करण्यात आल्याने दिव्यांग बांधवांना रोजच्या जीवनात येणाऱ्या अडचणींवर मोठा आधार मिळाला.
भारत सरकार सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग द्वारा एडीआयपी योजनेअंतर्गत भारतीय कृतीम अंग निर्माण निगम ( एलीम्को) कानपूर यांच्यामार्फत रावेर लोकसभेच्या लोकप्रिय खासदार रक्षाताई खडसे यांच्या प्रयत्नाने यावल तालुक्यातील पूर्व तपासणी व नोंदणी झालेल्या दिव्यांग बंधू भगिनींसाठी कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने वाटप शिबिरात तालुक्यातील अनेक दिव्यांग बांधवांना कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने वाटप करण्यात आल्याने दिव्यांग बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण होऊन आनंद व्यक्त करण्यात आला.
सोमवार दि.25 डिसेंबर 2023 रोजी यावल पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात दिव्यांग बांधवांसाठी कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने वाटप शिबिर सकाळी ११ वाजता घेण्यात आले, शिबिरामध्ये रावेर लोकसभेच्या लोकप्रिय खासदार रक्षाताई खडसे,भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा भावी उमेदवार अमोल दादा जावळे,डॉ.कुंदन फेगडे, यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हर्षल पाटील,भाजपा तालुका सरचिटणीस तथा संचालक उज्जैनसिंग राजपूत,भाजपा महिला तालुकाध्यक्ष जयश्रीताई चौधरी,अपंग आघाडी जिल्हाध्यक्ष अरुण पाटील,माजी जिल्हा परिषद सदस्य सौ.सविताताई भालेराव,भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष डॉ.नरेंद्र कोल्हे,तालुकाध्यक्ष उमेश फेगडे,हेमराज उर्फ बाळू फेगडे,किशोर कुलकर्णी,
डॉ.निलेश गडे यांच्या उपस्थितीत शिबिरामध्ये दिव्यांग बांधवांना कृत्रिम अवयव व साहित्य वाटप करण्यात आली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी युवा मोर्चा
तालुका अध्यक्ष सागर कोळी,लहू पाटील,योगेश चौधरी,भूषण फेगडे,युवा मोर्चा शहराध्यक्ष रितेश बारी,राहूल बारी,उमेश पाटील,देविदास नाना पाटील,सलीम तडवी सर, व्यंकटेश बारी,भाजपा महिला आघाडी शहराध्यक्ष सरला कवडीवाले,
कोमल इंगळे,योगराज बऱ्हाटे,अभय रावते,
आकाश कोळी, इत्यादी भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
टिप्पणी पोस्ट करा