यावल दि.११
महाराष्ट्रातील ग्रामसेवक संवर्ग तथा समविचारी संवर्गाच्या प्रशासकीय,सामाजिक,आर्थिक व अभिव्यक्ती बाबत सुरक्षितता निर्माण करून सर्वांगीण संरक्षण तयार करणे व महा मानवांनी दिलेल्या मूल्यांनुसार समता व न्याय या मूल तत्त्वाला स्वीकृत करून कामकाज करावे हे प्रमुख हे प्रमुख उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून नुकतेच महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक असोसिएशन (ट्रेड युनियन रजिस्टर नं- एन.जी.पी.-५८१३) सलग्न स्वतंत्र मजदूर युनियनचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन नागपूर येथे घेण्यात आले.त्याचे उद्घाटक माननीय जे.एस.पाटील राष्ट्रीय अध्यक्ष स्वतंत्र मजदूर युनियन,अध्यक्ष देवानंद फुलझेले गडचिरोली व मार्गदर्शक म्हणून माननीय ई.झेड. खोब्रागडे सर भाप्रसे (निवृत्त)तथा संस्थापक संविधान फाउंडेशन नागपूर,डॉक्टर चेतन जाधव सर गटविकास अधिकारी पंचायत समिती भिवापूर व माननीय गौतम मेश्राम सर सेवानिवृत्त गट शिक्षणाधिकारी तथा मुख्य संयोजक संविधान फाउंडेशन गडचिरोली यांचे प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक असोसिएशन ची राज्य कार्यकारणी अध्यक्ष यांच्या परवानगीने प्रमुख मार्गदर्शक माननीय ई .झेड.खोब्रागडे सर यांनी घोषित केली त्यात केंद्रीय सल्लागार पदी श्री गौतम आधार वाडे यांची जळगाव जिल्ह्यातून नियुक्ती करण्यात आली.तसे नियुक्तीचे पत्र त्यांना नुकतेच प्राप्त झाले आहे त्यांचे निवडीचे अभिनंदन महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे राज्याध्यक्ष संजीव निकम,राज्य सरचिटणीस सुचित घरत व जळगाव जिल्हाध्यक्ष नंदकुमार गोराडे व जिल्हा सचिव संजीव भारंबे जिल्हा उपाध्यक्ष दीपक तायडे तसेच जिल्हा कार्य कारणीतील सर्व पदाधिकारी व प्रत्येक तालुक्यातील सर्व तालुका अध्यक्ष व तालुका सचिव व सर्व जिल्हाभरातील ग्रामसेवक बंधू-भगिनी ग्रामविकास अधिकारी, जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी तसेच सर्व जिल्हा परिषद,पंचायत समिती व ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी देखील अभिनंदन केलेले आहे आपणावर असोसिएशन ने फार मोठी जबाबदारी टाकलेली आहे त्यामुळे कामगार अधिकारी व सर्व कर्मचाऱ्यांचे सेवा विषयक प्रश्न लोकशाही मार्गाने निकाली काढण्या करीता घटनात्मक तरतुदीनुसार कामकाज करणार असल्याचे केंद्रीय
सल्लागार श्री गौतम आधार वाडे यांनी सांगितले व निवड केल्याबद्दल आभार व्यक्त केले.
टिप्पणी पोस्ट करा