यावल दि.18
सातपुडा डोंगरात अतिदुर्गम भागातील मतदान केंद्राला भेट देण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यावल तहसीलदार सौ.मोहनमाला नाझीरकर यांनी रविवार दि. १७ रोजी १० किलोमीटर लांब अशा खडतर रस्त्यावरून पायदळ दौरा केला.गेल्या १० वर्षांपूर्वी अशाच प्रकारे तत्कालीन महिला जिल्हाधिकारी सुजाता सौनिक यांनी प्रसिद्धी माध्यम प्रतिनिधींसह आदिवासी भागातील बंधू भगिनींची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,तहसीलदार सौ. मोहनमाला नाझीरकर यांनी १० किलोमीटर पायदळ प्रवास करून सातपुडा डोंगरातील आंबापाणी येथील मतदान केंद्राची पाहणी केली तसेच आदिवासी बांधवांच्या विविध समस्या आणि अडचणी जाणून घेतल्या.
आंबापाणी गावाला महसुली गावाचा दर्जा देणे बाबत प्रस्ताव तयार करणे व त्यानुसार गावाला एलजीडी कोड देण्यात येईल त्यामुळे हे गाव शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरेल गावाच्या गावठाण जागा बाबतचा प्रस्ताव सुद्धा लवकरच तयार केला जाईल. तसेच गावातील व्यक्तींना १००% जातीचे दाखले वितरण करण्यासाठी शिबिर घेण्यात येईल गावात गर्भवती महिला व नवजात बालके यांचे लसीकरण व आरोग्य विषयक सुविधांकरिता सुद्धा शिबिराचे आयोजन करण्यात येईल. रस्त्यांचे काम करण्यात येईल तसेच शेतीकरीता जमीन सपाटीकरण व फळपीक लागवड,आदिवासी विभागांतर्गत शबरी घरकुल योजना राबविण्यात येतील इत्यादी कामे करून आदिवासी बंधू भगिनींचा/आदिवासी विभागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आंबा पाणी गावासाठी अशा प्रकारे तीन सुत्री कार्यक्रमाचे नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत.
आंबापाणी येथील मतदान केंद्राची पाहणी जिल्हाधिकारी, यावल तहसीलदार यांनी केली. चोपडा विधानसभा मतदारसंघातील हे जिल्हा परिषदेच्या शाळेतील एकमेव असे कच्चे मतदान केंद्र आहे त्यामुळे जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाडीचे लवकरच पक्के बांधकाम करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्याबाबत सूचना देण्यात आल्या.तपासणी दरम्यान महिला मतदारांची संख्या कमी असल्यामुळे या कारणांचा शोध घेऊन त्यांची जास्तीत जास्त नोंदणी करण्यासाठी प्रयत्न केले जातील,तसेच मयत मतदारांची नावे देखील तात्काळ कमी करण्याबाबत,मतदान केंद्रावर मतदान पथकातील टीम आणि मतदान साहित्य पोहोचविण्यासाठी वाहतूक आराखडा योग्य पद्धतीने नियोजन करण्याबाबत सुद्धा संबंधितांना सूचना देण्यात आल्या याचबरोबर या केंद्रावर ड्रोनद्वारे नियंत्रण ठेवण्याबाबतही सांगितले.
या पाहणी दौऱ्यात निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते,निवडणूक तहसीलदार रशीद तडवी,अरुण चौधरी, मंडळाधिकारी अतुल बडगुजर, तलाठी टेमरसिंग बारेला उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा