यावल दि.२०
तापी पाटबंधारे विकास महामंडळ जळगाव,जळगाव पाटबंधारे प्रकल्प मंडळ अंतर्गत वाघुर प्रकल्प डावा कालव्यातील साफसफाई करतानाच्या कामात म्हणजे स्वच्छता ही सेवा,'कचरा मुक्त भारत ' अभियान १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर २०२३ दरम्यान राबविण्यात आले या अभियानात म्हणजे तापी पाटबंधारे विकास महामंडळात कोणकोणत्या कॉन्ट्रॅक्टरने आणि अधिकाऱ्यांने विकास करून घेतला याबाबत संपूर्ण जळगाव जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरु आहे.
वाघुर प्रकल्प डावा कालवा मधील व कालव्याच्या आजू बाजूला असलेले झाडे झुडपे,गवताची १५ दिवसापूर्वी खाजगी अत्याधुनिक मशिनरीने साफसफाई करण्यात आली.ही साफसफाई करताना लाखो रुपयाचे ( अंदाजे ४० ते ५० लाख रुपयाचे ) काम असल्याने कामाचे टेंडर काढण्याच्या आधी काम करण्यात आले आहे का..? आणि टेंडर काढले असेल तर कोणत्या तारखेला आणि कोणत्या वर्तमानपत्रातून टेंडर काढले..? किंवा टेंडर काढण्याच्या अटी शर्तीचे पालन म्हणून एकाच कामाचे अंतरानुसार किंवा किमतीनुसार तुकडे पाडून कामाची बिले सोई नुसार काढण्याचा घाट कोणी रचला आहे का..?
तापी पाटबंधारे विकास महामंडळात म्हणजे जळगाव पाटबंधारे प्रकल्प मंडळात खाजगी अत्याधुनिक मशिनरी उपलब्ध असल्याने मंडळाला फक्त डिझेल इंधनाचा खर्च लागला असता,वाघुर प्रकल्प व यांत्रिकी विभाग यांच्याकडे अत्याधुनिक मशिनरी उपलब्ध असताना खाजगी ठेकेदाराच्या अत्याधुनिक मशिनरीच्या माध्यमातून कामे करून घेण्याचा नेमका उद्देश कोणाचा आणि कशासाठी..? वाघुर प्रकल्प व यांत्रिकी यांच्या कार्यक्षेत्रात कोणत्या आणि किती क्षमतेची अत्याधुनिक मशनरी पाहिजे होती याचा विचार,अंदाज,कल्पना,नियोजन अधिकाऱ्यांकडे नव्हते का..? कामाची बिले सोयीनुसार टक्केवारीसाठी काढले जाणार आहेत का .? इत्यादी अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासन यांच्या आदेशानुसार दि. १५ सप्टेंबर २०२३ ते २ ऑक्टोबर २०२३ दरम्यान 'कचरा मुक्त' अभियानाचे बॅनर बघितले असता तापी पाटबंधारे विकास महामंडळ जळगाव,जळगाव पाटबंधारे प्रकल्प मंडळ जळगाव यांच्यातर्फे स्वच्छ भारत अभियान अंतर्गत जलसंपदा खात्यातर्फे वाघूर प्रकल्प व यांत्रिकी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता अभियान कार्यक्रम राबविण्यात आल्याचे दिसून येते.
परंतु वाघुर प्रकल्प प्रकल्प अंतर्गतील डाव्या कालव्यातील साफसफाई करताना खाजगी कॉन्ट्रॅक्टर च्या माध्यमातून अत्याधुनिक मशिनरीच्या साहाय्याने साफसफाई करण्यात आली त्याचे नियोजन सुद्धा बॅनर मधील संबंधित महामंडळ प्रकल्प मंडळ आणि वाघुर प्रकल्प यांत्रिकी विभाग यांनी कोणाच्या आदेशानुसार आणि ते सुद्धा संयुक्तिकपणें कसे केले स्वच्छता अभियान मजुरांमार्फत करायला पाहिजे की मशिनरी मार्फत करायचे याबाबत सुद्धा जळगाव जिल्ह्यात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
टिप्पणी पोस्ट करा