यावल दि.1
मी यावलकर या शीर्षकाखाली यावल शहरातील बहुसंख्य तरुण मंडळी एकत्र येऊन यावल नगरपरिषदेच्या संयुक्त विद्यमाने प्रत्येक व्यक्तीच्या, तरुणाच्या जीवनातील अंतिम सत्य असलेल्या ठिकाणाचे महत्त्व लक्षात घेऊन आणि जनजागृती होण्याच्या दृष्टिकोनातून आज रविवार दि.1आक्टोंबर 2023 रोजी यावल येथील स्मशानभूमीमध्ये श्रमदान करून यावलकरांचे लक्ष वेधले.
हा श्रमदान उपक्रम प्रामुख्याने मी यावलकर तरुण युवक मंडळ व यावल नगरपरिषदेने संयुक्तिकरित्या यावल स्मशानभूमी मध्ये पार पाडला.श्रमदानासाठी मी युवक मंडळाला व नगरपरिषदेला शहरातून सर्व स्तरातून उत्तम प्रतिसाद मिळाला.मी यावलकर या मंडळाच्या वतीने पराग सराफ यांनी श्रमदान करणे साठी शहरातील युवक तरुण मंडळीला एक आठ दिवस आधी आव्हान केले होते. स्मशान भूमी श्रमदान साठी शहरातील प्रामुख्याने नवनाथ भक्त परिवार,प्रकाश गणेश मंडळ,विठ्ठलवाडी मित्र परिवार, रेणुका देवी परिसरातील तरुण, शिवतीर्थ मित्रपरिवार, शहरातील डॉक्टर,मेडिकल असोसिएशनसह एक दिवस महाराजांसाठी संस्थेतील सभासद,वाणी गल्लीतील तरुण,धोबीवाडा मधील तरुण,पंचवटी मित्र मंडळ तसेच यावल नगरपरिषद पाणीपुरवठा व साफसफाई स्वच्छता विभाग प्रमुख तथा अभियंता सत्यम पाटील व कर्मचारी दादू धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेच्या इतर कर्मचाऱ्यांनी व मी यावलकर तरुण मित्रमंडळीने अडीच ते तीन तास श्रमदानाचे काम स्मशान भूमीत केले आणि हा श्रमदानाचा संदेश संपूर्ण यावल शहरात वाऱ्यासारखा पसरला.
टिप्पणी पोस्ट करा