यावल दि.१९. शहरातील विस्तारित कॉलनी भागात पालिकेच्या माध्यमातून पाणीपुरवठा व्हावा म्हणून तडवी कॉलनी भागात १० लक्ष लिटर क्षमतेचा जलकुंभ बांधण्यात आला आहे.पाणी वितरणासाठी पाईपलाईन सुद्धा टाकलेली आहे. पाणीपुरवठा व्हावा म्हणून त्या भागातील नागरिकांनी अधिकृत रक्कम भरणा करून व आगाऊ वार्षिक पाणीपट्टी शुल्क भरणा करून नळ जोडणी केली होती.मात्र मार्च २०२२पर्यंत पाइपलाइनद्वारे नवीन नळ धारकांना पाणी पुरवठा झालेला नव्हता.अशा ३२८ नळधारकांना पाणीपट्टी शुल्क आकारू नये अशी मागणी माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी १७ मार्च २०२२ रोजी पत्र देऊन केली होती व ती मागणी मंजूर देखील करण्यात आली होती. त्याप्रमाणे मागील वर्षी नवीन नळ धारकांना कुठलीही पाणीपट्टी न आकारता पालिकेने दिलासा दिला होता. पण यंदा सन २०२३/२४मध्ये पालिकेने पाठविलेल्या पाणीपट्टी बिलात मागील वर्षाची थकबाकी १५०० रुपये + व्याज १२० रुपये व चालु वर्षाचे १५०० रुपये असे एकूण ३१२० रू पाणीपट्टी आकारली होती.नागरिकांना पाठविण्यात आलेल पाणीपट्टी शुल्क बेकायदेशीर असुन नवीन नळ धाराकांवर अन्याय करणारे आहे म्हणून ते रद्द करण्यात यावे अन्यथा जिल्हाधिकारी यांचे कडे दाद मागण्याचा ईशारा अतुल पाटील यांनी दिला होता.अतुल पाटील यांच्या मागणीनुसार पालिकेने दखल घेऊन थकबाकी सदराखाली देण्यात आलेली रक्कम १६२० रू कमी केली आणि तसे पत्र पाटील यांना दिले आहे.सदर पत्रामध्ये विस्तारीत भागातील नवीन ३२८ नळ धारकांना सन २०२१/२२चे पाणीपट्टी शुल्क माफ करणेबाबत प्रशासक न. पा.यावल यांनी मंजुरी देऊन मायनेट् प्रणाली सिस्टीम मध्ये समायोजित करून माफ केलेले होते.परंतु शासनाकडून नविन प्रणाली महा यूएलबी सिस्टीम मध्ये माफ केलेले परिणाम दिसुन आले नाही म्हणून ३२८ नळ धारकांना मागील पाणीपट्टी व व्याज १६२० रू व चालु सन २०२३/२४ची पाणीपट्टी १५००रू असे एकूण ३१२० रू पाठविण्यात आले होते.ऑनलाईन प्रणाली मध्ये बदल झाल्याने सदरचे बिल चुकून पाठविले गेल्याचे पालिकेने मान्य केले असुन मागील थकबाकी सदराखाली देण्यात आलेले १६२० रू.न. पा.ने नवीन प्रणाली महा यूएल बी सिस्टीम मध्ये कमी करण्यात आले असुन आता फक्त सन २०२३/२४या चालु वर्षाची पाणीपट्टी १५००रू नागरिकांना भरावे लागेल असे म्हटले असुन तसे पत्र अतुल पाटील यांना देण्यात आलेले आहे.विस्तारीत भागातील नवीन नळ धारकांना मागील थकबाकी या सदराखाली १६२० रू जास्तीची पाणीपट्टी पालिकेच्या कर निर्धारण विभागाच्या वतीने आकारले होते.पालिकेची ही मागणी बेकायदेशीर होती.नवीन नळ धारकांना पाणीपट्टी बिल मिळाल्यानंतर जागरूक नागरिकांनी माझ्याशी संपर्क साधून सदर बाब माझ्या निदर्शनास आणून दिली असता मी तत्काळ पालिकेस पत्र देऊन अवगत केले.त्यानुसार पालिकेने मायनेट प्रणाली ऐवजी महा यूएलबी प्रणाली सिस्टीम मध्ये सदर नळ धारकांचा समावेश करुन तांत्रिक चुकीमुळे पाठविण्यात आलेली थकबाकी रक्कम रद्द केली आहे.सजग नागरिकांमुळे हा प्रश्न प्रशासनासमोर मांडता आला व त्याला यश मिळाले. विस्तारीत भागातील ३२८ नळ धारक यांचे प्रत्येकी १६०० रू. रक्कम वाचवता आली म्हणून समाधानी असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी दिली.
टिप्पणी पोस्ट करा