यावल दि.२७
आदिवासी गुणवंत विद्यार्थी गुणगौरव व आद्य क्रांतिकारी तंट्या भिल आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा यावल पंचायत समिती हॉलमध्ये रविवार दि.२४ सप्टेंबर २०२३ रोजी यावल तालुका गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके यांच्या अध्यक्षतेखाली व यावल सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता अनिल शावखा यांच्या शुभहस्ते उद्घाटन करून संपन्न झाला.
या स्तुत्य सामाजिक उपक्रमात जळगाव डेप्युटी सीओ रफिक रुबाब तडवी, धुळे येथील जिल्हा कृषी अधिकारी कुर्बान मुराद तडवी, जात पडताळणी पथक अधिकारी रशीद सुभान तडवी जळगाव येथील पोलीस निरीक्षक फारूक बशीर, नाशिक येथील पुरवठा अधिकारी रमजान शालम तडवी,कठोरा येथील हमीद फकीरा,वीज वितरण कंपनी मधील रोशन हसन,नवाज तडवी,श्रीकांत मोटे,मुंबई येथील एडवोकेट तनुजाताई तडवी,
गुलाब तडवी,आमोदा सरपंच जुगराबाई लतीफ, जाबीर सर,गफ्फार आप्पा, सरपंच लियाकत जमादार, मासूमभाई,नायगाव येथील हाजी सचिन बिरहान,परसाडे येथील बशीर तडवी,आरिफ सर,जहांगीर सर इत्यादी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमात समाज बांधवांच्या उपस्थितीत सर्वच विषयात विशेष प्रावीण्य मिळविलेल्या 150 विद्यार्थ्यांना फाईल, ट्राफी,स्मृतीपत्र देवून सत्कार करून प्रोत्साहीत करण्यात आले.बहुसंख्य आदिवासी विद्यार्थी असलेल्या शाळेवर शिकविणाऱ्या 10 शिक्षकांना आद्य क्रांतिकारी तंट्या मामा भिल आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करून आभार मानले.अनिल (जहांगीर)
शावखा तडवी साहेब यांना महाराष्ट्र शासनाचा आदर्श अभियंता पुरस्कार मिळाल्याने त्यांचा ही सन्मान करून सत्कार करण्यात आला.
रशिद सुभान तडवी साहेब जात पडताळणी चौकशी पथक प्रमुख यांनी आदिवासी लोकांना व्हॅलेडिटी मिळण्यासाठी कोणत्या अडचणी येतात व त्यासाठी कोणते पुरावे महत्त्वाचे असतात या विषयी सखोल मार्गदर्शन केले.
नवनिर्वाचित सरपंच म्हणून जुगारबाई लतीफ तडवी, सरपंच आमोदा व रज्जाक दादा तडवी सरपंच धानोरा यांचा ही सत्कार करण्यात आला.संजु भाई जमादार यांची जळगाव जिल्हा कॉंग्रेस अध्यक्षपदी (आदिवासी सेल) निवड झाल्याने सन्मान केला गेला.
आसेम संस्थापक अध्यक्ष राजू तडवी,अनिल नजीर तडवी,इरफान तडवी सर,सलीम तडवी सर,शब्बीर पटेल दादा,एलआयसीचे सलीम तडवी,कवी बी.राज तडवी,न्याजुद्दिन वेंडर,युसुब तडवी, गोटू भाऊ तडवी, घसर सोसायटीचे संजू मुशीर, शब्बीर पटेल उर्फ ठाकूर विरावलीचे नसीर तडवी, फैजपूर येथील सुभेदार इमाम,मनवर बुऱ्हाण सर, सद्दाम तडवी, युनूस हयात, मोहसिन राजू,जमशेर पोस्ट मास्तर,जब्बारभाई तडवी,
रज्जाक तडवी,युनुस ऊखा,इत्यादी आयोजकांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.विशेष म्हणजे सर्व स्तरातील समाज बांधवांसह हितचिंतक विद्यार्थी-पालक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होते.वाढता प्रतिसाद बघता पुढील वर्षी कार्यक्रमाचे नियोजन आणखी चांगल्या पद्धतीने केले जाणार.शेवटी सर्व उपस्थितांचे व ज्या मान्यवरांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तन,मन,धनाने सहकार्य केले तसेच आसेम पदाधिकारी,सदस्य,कार्यकर्ता,
मदतगारांचे मनस्वी आभार व्यक्त करण्यात आले.
टिप्पणी पोस्ट करा