यावल येथील नवभारत गणेश मित्र मंडळ अध्यक्षपदी सागर इंगळे, उपाध्यक्ष हेमंत फेगडे.


यावल दि.1
काल गुरुवार दि.31ऑगस्ट 2023 रोजी आगामी गणेशोत्सव निमित्त यावल शहरातील नवभारत गणेश मित्र मंडळ महाजन गल्ली येथे बैठक व नवीन कार्यकारणी सर्वानुमते जाहीर करण्यात आली या बैठकीत गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी सागर इंगळे तर उपाध्यक्षपदी हेमंत फेगडे यांची सर्वांनुमते तसेच प्रभागातील मान्यवरांच्या उपस्थित निवड करण्यात आली.
     यावेळी प्रमुख उपस्थितीत प्रमोद शेठ नेमाडे,निर्मल चोपडे,उमेश फेगडे,राकेश कोलते,धीरज महाजन,हेमराज फेगडे,ओंकार राणे उपस्थित होते. यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेण्यात आली व नवनिर्वाचित कार्यकारणी जाहीर करण्यात आली, अध्यक्ष सागर इंगळे,उपाध्यक्ष हेमंत फेगडे,सचिव हितेश फेगडे,खजिनदार निर्मल चोपडे,सहखजिनदार स्नेहल फिरके अशी नवनिर्वाचित कार्यकारिणी जाहीर करण्यात आली तसेच उपस्थित गणेश मंडळ सदस्य भुषण फेगडे,
मुकेश घोडके,रितेश बारी,किशोर महाजन,दिपक फेगडे,कोमल इंगळे,भुषण वारके,सोहन कोळंबे,वैभव फेगडे,जयेश करांडे,लतेश नेमाडे,
भुषण नेमाडे,गौरव करांडे, तसेच मंडळाचे सर्व जेष्ठ व तरुण मंडळी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात