यावल दि.28
आज दि.27/8/2023 रविवार रोजी कास्ट्राईब कर्मचारी महासंघ जिल्हा जळगांव अंतर्गत सर्व संलग्न संघटनांची मासिक सभा कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे नाशिक विभागीय अध्यक्ष रविंद्र तायडे यांच्या अध्यक्षतेखाली जळगाव येथील अजिंठा शासकीय विश्रामगृह येथे पार पडली. यामध्ये नियोजित विषयांवर चर्चा करण्यात आली.पूणे येथे दि.3 सप्टेंबर 2023 रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय बैठकीबाबत चर्चा करण्यात आली.
जळगांव जिल्ह्यातील राज्यस्तरीय प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली.ग.स. सोसायटीच्या धोरणाबाबत सुद्धा सभेमध्ये चर्चा करण्यात आली.मनपा आयुक्त यांच्या समवेत होणाऱ्या बैठकीबाबत चर्चा करण्यात आली.या बैठकी प्रसंगी महासंघाचे जिल्हाध्यक्ष पुलकेशी केदार,शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बापू साळुंके,महासंघाचे जिल्हा सचिव ब्रम्हानंद तायडे,महासंघ जिल्हा कार्याध्यक्ष योगेश अडकमोल,शिक्षक संघटना जिल्हा सचिव राजीव वानखेडे , कार्याध्यक्ष किशोर साळुंके, भुसावळ तालुका अध्यक्ष समाधान जाधव,मनपा विभागाचे सुरेश भालेराव,नंदू गायकवाड,जिल्हा कोषागार विभागाचे रविंद्र गायकवाड, महेश सपकाळे,चिंचोले साहेब , गोपीचंद भालेराव,राजेंद्र शिंदे,यांची उपस्थिती होती.
टिप्पणी पोस्ट करा