जळगाव जिल्हा बँकेत ज्येष्ठ महिला सभासदाच्या हस्ते झेंडावंदन. जिल्हा बँक चेअरमन यांच्या निर्णयाचे जिल्ह्यात कौतुक.


यावल दि.16 
जळगाव जिल्हा बँकेच्या यावल तालुक्यातील ज्येष्ठ महिला सभासद श्रीमती पुष्पाताई लीलाधर चौधरी यांच्या शुभहस्ते जळगाव जिल्हा बँकेचे झेंडावंदन करण्यात आले.जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार यांनी व संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयाचे रावेर लोकसभा व विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यातून कौतुक आणि स्वागत केले जात आहे.
       एकेकाळी आशिया खंडात नावारूपाला असणारी दगडी बँक म्हणजेच जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या बँकेमध्ये चेअरमन म्हणून जळगाव जिल्ह्यातील वेगवेगळ्या पक्षातील राजकीय ज्येष्ठ नेत्यांनी चेअरमन पदाची धुरा सांभाळलेली आहे परंतु विद्यमान चेअरमन भाऊसाहेब संजय मुरलीधर पवार यांनी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन झाल्यानंतर प्रथम झेंडावंदन त्यांच्या हातून होईल अशी बँकेची पद्धत आहे कारण यापूर्वी 15 ऑगस्ट व 26 जानेवारी या दोन्ही दिवशी झेंडावंदन करण्याचा मान हा जिल्हा बँकेचे चेअरमन,व्हाईस चेअरमन किंवा संचालक यांना मिळत असतो परंतु जळगाव जिल्हा बँकेला 106 वर्ष पूर्ण होत आहे आणि अशावेळी विद्यमान चेअरमन भाऊसाहेब संजयजी पवार यांनी एक अतिशय कौतुकास्पद निर्णय घेऊन जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्रजी देशमुख यांना सूचना केल्या की जळगाव जिल्हा बँकेचे यावेळीच झेंडावंदन जळगाव जिल्हा बँकेच्या ज्येष्ठ महिला सभासद यांच्या हस्ते करावे असे सांगितल्याने श्री देशमुख यांनी लगेचच संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन तशी निवड करण्यास सांगितले त्यानुसार योगायोग जुळून आला की जिल्हा बँकेचे एकेकाळी सांगवी तालुका यावल येथील त्र्यंबक श्यामजी चौधरी हे जिल्हा बँकेचे 45 वर्ष संचालक होते त्यानंतर लीलाधर त्र्यंबक चौधरी हे जवळपास जिल्हा बँकेचे 30 ते 35 वर्षे संचालक होते व त्यानंतर प्रशांत लीलाधर चौधरी हे देखील जिल्हा बँकेचे दहा वर्षे संचालक होते जवळपास एकाच कुटुंबात 80 ते 90 वर्ष संचालक होण्याचा मान हा जळगाव जिल्ह्यातील सांगवी येथील चौधरी कुटुंबाला मिळालेला आहे आणि हा योगायोग समजून त्यांच्याच परिवारातील महिला सभासद श्रीमती पुष्पाताई लीलाधर चौधरी वय वर्ष 80 यांना झेंडावंदन करण्याचा मान जिल्हा बँकेच्या वतीने देण्यात आला याबद्दल  सभासदांमध्ये व कर्मचाऱ्यांमध्ये कौतुक केले जात होते जिल्हा बँकेचे चेअरमन भाऊसाहेब संजयजी पवार व कार्यकारी संचालक जितेंद्रजी देशमुख यांच्या हस्ते श्रीमती पुष्पाताई चौधरी यांना शाल श्रीफळ व साडी चोळी देऊन त्यांचा यथोचित मानसन्मान करण्यात आला श्रीमती पुष्पाताई चौधरी यांनी देखील जळगाव जिल्हा बँकेने एक वेगळी प्रथा सुरू केल्याबद्दल मनस्वी समाधान व्यक्त केले जळगाव जिल्हा बँकेच्या 106 वर्षाच्या इतिहासात ज्येष्ठ सभासदाने झेंडावंदन करण्याचा मान मिळाल्याचे ही प्रथम घटना असल्याचे बोलले जात आहे

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात