यावल येथील सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये
मंगळवार दि.15 ऑगस्ट 2023 रोजी भारतीय स्वातंत्र्य दिन विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये स्वतंत्रता दिन साजरा करताना कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सैन्य दलात १८ वर्ष कार्यरत असलेले सूर्यभान पाटील सर तसेच संस्था सदस्य शशिकांत फेगडे सर तसेच शाळेतील पालक समितीचे सर्व सदस्य,शहरातील मान्यवर यांची उपस्थिती होती.सर्वात प्रथम राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करून ध्वज फडकावण्यात आला.तसेच राष्ट्रगीत म्हणून भारत माता की जय अशा घोषणा देण्यात आल्या.१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमास सुरुवात करण्यापूर्वी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.सर्वात प्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शिला तायडे मॅडम यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन प्रमुख पाहुण्यांचा आदर सत्कार करण्यात आला.इयत्ता नर्सरी पासून दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेऊन मोठ्या उत्साहात कार्यक्रमास
सुरुवात केली.सर्व विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक नृत्यात आपले कला कौशल्य सादर करून स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात व जल्लोषात पार पाडला.तद्नंतर सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.संस्था अध्यक्ष राजेंद्र महाजन सर व दिपक महाजन सर यांच्या अध्यक्षतेखाली स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.वर्षा भुते मॅडम व सौ. मंजुषा साळुंखे मॅडम यांनी केले.प्रशांत फेगडे सर यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षकवृंद व कर्मचारी वर्गाने कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.तसेच सर्व पालकांनी देखील आजच्या कार्यक्रमास उपस्थिती देऊन सहकार्य केले व त्यामुळे स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात व जल्लोषात शांततेत पार पडला.
टिप्पणी पोस्ट करा