यावल दि. 11
पवित्र असा श्रावण महिना येत्या सोमवार पासून सुरू होत आहे,यावल ते ओंकारेश्वर उज्जैन (मध्यप्रदेश),व यावल ते त्रंबकेश्वर (महाराष्ट्र )येथे भाविकांना जाण्यासाठी विशेष एस.टी.बसेस उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी डॉ.कुंदन फेगडे यांनी यावल आगार प्रमुख दिलीप महाजन यांच्याकडे केल्याने यावल आगारातून एस.टी.बसेस सुरू होत आहे.
त्या निमित्याचे यावल ते ओंकारेश्वर (मध्यप्रदेश),उज्जैन (मध्यप्रदेश) त्र्यंबकेश्वर (महाराष्ट्र) या ठिकाणी भाविक मोठ्या संख्येने आणि श्रद्धेने यात्रा करायला जात असतात व आता पण जातील या उद्देशाने तसेच भाविकांची सुविधा व्हावी यासाठी यावल आगार व्यवस्थापक प्रमुख दिलीप महाजन यांना यावल- रावेर तालुका आश्रय फाउंडेशनचे संचालक डॉ.कुंदन फेगडे यांनी निवेदन दिले.यावल आगारातर्फे एस.टी.बसेस उपलब्ध होणार असल्याने यावल,फैजपूर,रावेर अश्या तिन्ही प्रमुख शहरातील व ग्रामीण भागातील भाविकांना यांचा लाभ होणार आहे,तसेच महामंडळाचे सुद्धा आर्थिक आर्थिक उत्पन्न वाढणार असल्याने येत्या सोमवार पासून एस.टी.बसेस सुरू होत आहेत.श्रावण महिन्यानिमित्त भाविकांनी ओंकारेश्वर व त्र्यंबकेश्वर जाऊन महाकालेश्वर यांचा दर्शनाचा लाभ घ्यावा असे आव्हान डॉ. कुंदन फेगडे यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा