यावल दि.13
ज्येष्ठ सामाजिक संस्कृती ही काळाची गरज होती आणि आहे असे प्रतिपादन डॉ.नरेंद्र महाले यांनी केले.
श्री अष्टभुजा जेष्ठ नागरिक संघाची साप्ताहिक सभा संघाचे अध्यक्ष श्री रघुनाथ आप्पासाहेब सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली नवशक्ती आवारात पार पडली.सभेची सुरुवात रामनाम जपाने विकास टोपरे यांनी केली. विश्वप्रार्थना व प.पु. ब्रम्हचैतन्य श्री गोंदवलेकर महाराजांचे प्रवचन वाचन लता बेंडाळे यांनी केले.संघाचे अध्यक्ष रघुनाथ आप्पा सोनवणे यांनी प्रमुख वक्ते डॉ.नरेंद्र महाले यांचा परिचय करून दिला.तसेच गुलाब पुष्प व भेटवस्तू देऊन सत्कार केला.
डॉ. नरेंद्र महाले यांनी जेष्ठाशी सुसंवाद साधून उपयुक्त मार्गदर्शन केले. समाजात ज्येष्ठांची जी संस्कृती आहे तीच आजच्या काळात जतन करणे फार महत्त्वाचे आहे.ती आज काळाची गरज आहे हे त्यांनी काही उदाहरणांद्वारे स्पष्ट केले.आपल्या मार्गदर्शन पर भाषणात त्यांनी माईंडसेटिंग चे महत्व पटवून देत. सामाजिक स्वराचार थांबवून,जीवन सामाजिक स्वातंत्र्यात जगता येण्यासंदर्भात उद्बोधन केले. प्री-वेडिंग शूटिंग संस्कृतीचे अंधानुकरण न करता डोळसपणे जपवणूक केली पाहिजे,नवीन माहिती आपण गोळा केली पाहिजे.आपली ज्येष्ठांची संस्कृती सुसंस्कृत आहे आणि ही संस्कृती समाजासाठी ऊर्जा स्त्रोत आहे.हे सर्व मुद्दे उदाहरण उदाहरणे देऊन स्पष्ट केले. अतिशय प्रबोधनमय व उपयुक्त माहिती रसाळ व ओघवत्या भाषेत दिली.सर्व सभासद अक्षर अक्षरशः भारावून गेले व आनंदाचे अनुभूती घेतली.यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या चिमुकल्या हंसिका,नक्षत्रा या हजर होत्या.त्यांनाही ज्येष्ठांनी भरभरून आशीर्वाद दिला. नंतर संजय चापोरकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. पसायदान राष्ट्रगीत सोमा डोळे यांनी म्हटले.सभेचे सूत्रसंचालन अलका ढाके यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संघाचे सभासद यांनी सक्रिय सहभाग होऊन सहकार्य केले.
टिप्पणी पोस्ट करा