चित्रकलेच्या माध्यमातुन शिवचरित्र बालकामध्ये रूजले : डॉ.कुंदन फेगडे. यावलला शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण.

यावल दि.7
यंदाचा ३५० वा शिवराज्याभिषेक दिन साजरा करतांना येणाऱ्या पिढीला शिव छत्रपतींच्या कार्याची माहिती होत ती त्यांनी आत्मसात केली पाहिजे या उद्देशाने चित्रकला स्पर्धा घेण्यात आली व चित्रकलेच्या माध्यमातुन शिवचरित्र बालकामध्ये रूजले आहे असे प्रतिपादन डॉ.कुंदन फेगडे यांनी केले ते ३५० शिवराज्याभिषेक दिन निमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी ते बोलत होते.
            डॉ.कुंदन फेगडे मित्र परिवाराच्या वतीने यंदाचा ३५० वा शिवराज्याभिषेक दिन साजरा करतांना विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती यात छत्रपती शिवाजी महाराज शिवराज्याभिषेक सोहळा,कोणत्याही एका गड किल्ल्याची प्रतिमा रेखाटने व छत्रपती शिवाजी महाराज यांची अश्वारूढ प्रतिमा रेखाटने अशा विषयाचे ही चित्रकला स्पर्धा होती यात ४६ विद्यार्थी स्पर्धकांनी सहभाग घेतला,ऑनलाईन पार पडलेल्या या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना यावल येथील आई हॉस्पिटल मध्ये बक्षीस वितरण करण्यात आले या निमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ.कुंदन फेगडे यांनी स्पर्धे मागील उद्देश स्पष्ट करतांना सांगीतले की येणाऱ्या पिढीला शिव छत्रपतींच्या कार्याची माहिती व्हावी व स्पर्धेच्या माध्यमातुन शिवचरित्र त्यांना आत्मसात करता यावे म्हणुन ही स्पर्धा घेण्यात आल्याचे त्यांनी सांगीतले तर या स्पर्धेतील विजेत्यांना येथे बक्षीस देवुन सन्मानीत करण्यात आले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सागर लोहार यांनी केले तर आभार मनोज बारी यांनी मानले.
        चित्रकला स्पर्धेत यांनी पटकावले बक्षीस - या स्पर्धेत प्रथम क्रमांक तपस्या चुडामण पाटील यावल हिने पटकावला तीला २ हजार १०० रूपये व प्रमाणपत्र देण्यात आले तर द्वितीय क्रमांक मोहित अनिल पाटील चिनावल ता.रावेर  याने पटकावले त्यास १ हजार १०० रूपये व प्रमाणपत्र आणी तृतीय क्रमांक साक्षी विलास पाटील उचंदा ता.मुक्ताईनगर हिने पटकावले तील ५०१ रूपये रोख व प्रमाणपत्र देवुन सन्मानीत करण्यात आले. इतर सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देवुन गौरवण्यात आले.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात