यावल येथे जय बाबाजी भक्त परिवारा तर्फे महाश्रमदान सोहळा संपन्न.


यावल दि.५
निष्काम कर्मयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी (मौनगिरीजी) महाराज यांनी समाजाच्या उन्नतीसाठी जपानुष्ठान, यज्ञ, गुरुकुल, गोसेवा, कृषी-ऋषी सेवा, व श्रमदान या परंपरा दिल्या आहेत.या सर्व परंपरेत प.पू.जनार्दन स्वामी यांनी श्रमदान परंपरेला विशेष असे महत्त्व दिले आहे श्रमदान परंपरा ही मागील ६० वर्षापासून जनार्दन स्वामींनी सुरू केली आहे.या श्रमदान  परंपरेला अनुसरून जनार्दन स्वामींचे उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी श्री. श्री.१००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज व सर्व जय बाबाजी भक्त परिवार यांनी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याच्या चरणापाशी देव देश धर्मासाठी 1 कोटी 25 लाख 34 हजार 567 तास महाश्रमदान करण्याचा महासंकल्प केला आहे.याच महासंकल्पाच्या माध्यमातून एकाच दिवशी एकाच वेळी भारतातील 500 ऐतिहासिक व प्राचीन धार्मिक स्थळांवर हजारो जय बाबाजी भक्त परिवारातर्फे काल रविवार दि. 4 जून 2023 रोजी महाश्रमदान करण्यात आले. या महाश्रमदानानिमित्त श्रीक्षेत्र यावल येथील श्री वेद महर्षी व्यास मंदिरात यावल तालुक्यातील जय बाबाजी भक्त परिवाराकडून मोठ्या संख्येने श्रमदानाच्या माध्यमातून श्री व्यास मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली.श्री व्यास मंदिरात सकाळी ५ वाजता प.पू.बाबाजींची विधी व आरती करून महाश्रमदानाचा शुभारंभ श्री वेद महर्षी व्यासांच्या मूर्तीचे व परमपूज्य जनार्दन स्वामींच्या प्रतिमेचे पूजन करून व श्रीफळ वाढवून महाश्रमदान सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला.या महा श्रमदान सोहळ्यात यावल तालुक्यातील सर्व जय बाबाजी भक्त परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर श्रमदान सोहळा यशस्वी करण्याकरिता भक्त परिवाराने परिश्रम घेतले.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात