यावल दि.16
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय समोर सलग १४ जून पासून कापूस भाववाढी साठी बसलेले उपोषणकर्ते राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील यांचे कडकडीत उन्हात विना अन्न पाण्याने बसलेल्या माणसाची माणुसकी समजून तरी प्रकृतीची,आरोग्याची साधी विचारणा सुधा हे शिंदे फडणवीस सरकारचे प्रशासन करत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे... दरम्यान प्रशासनाच्या कर्तव्यात कसूर करताना उपोषणकर्ते यांचे काही बरे वाईट झाल्यास शासन जबाबदार राहील असे निवासी जिल्हाधिकारी यांना भेटून भावना व्यक्त केल्या.
या बाबत बोदवड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आबा पाटील यांनी शासनाला कडकं इशारा दिला आहे.यावेळी जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस दीपक पाटील,सतीश पाटील,युवक तालुकाध्यक्ष अतुल चव्हाण,निलेश जाधव कंडारी इत्यादी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा