यावल दि.24
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ वर्षाची सेवा सुशासन व गरीब कल्याण कारकिर्दीचा लेखाजोखा भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी समजावून घेत लाभार्थ्यांच्या घरोघरी/ दारात जाऊन नऊ वर्षाच्या यशस्वी कारकिर्दीचा जागर यावल तालुक्यासह रावेर विधानसभा क्षेत्रात सुरू करण्यात आला आहे याबाबतची सविस्तर माहिती रावेर विधानसभा क्षेत्र प्रमुख अमोलदादा जावळे यांनी आज दि.24 रोजी पत्रकार परिषदेत दिली.
यावल कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत भाजपाचे तालुका सरचिटणीस विलास चौधरी,यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हर्षल पाटील, यावल पंचायत समितीचे माजी उपसभापती दीपक अण्णा पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक उज्जैनसिंग राजपूत,राकेश फेगडे सौ.कांचन फालक भाजप शहराध्यक्ष डॉ.निलेश गडे,डॉ.सुनील पाटील, तसेच अतुल भालेराव,जिल्हा परिषद सदस्या सौ.सविता अतुल भालेराव,बाळू उर्फ हेमराज फेगडे,व्यंकटेश बारी, इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
नागरिकांच्या व लाभार्थ्यांच्या घरोघरी जाऊन प्रत्यक्ष भेटी घेऊन मोदी सरकार मार्फत जनसामान्यांपासून तर विविध क्षेत्रात करण्यात आलेल्या विविध विकास कामांचा लेखाजोखा मांडून माहितीपत्रक वाटप केले जात असून याबाबत नियोजनबद्धरीत्या जनकल्याणकारी योजनांची माहिती देण्यात येत आहे मोदी सरकारच्या कामकाजाविषयी वैयक्तिक अनुभव जाणून घेण्यात येत आहेत.अंत्योदय हेच ब्रीद वाक्य,सशक्त शेतकरी समृद्ध भारत,भारतातील अमृत पिढी सक्षम बनते,नारी तू नारायणी;महिला सक्षमीकरण,मध्यमवर्गीय जीवन सोपे झाले,निरोगी जीवन प्रत्येकाचा हक्क, सक्षम भारत,पायाभूत सुविधांचा अभूतपूर्व विकास, सांस्कृतिक वारसाचे नवीन युग इत्यादी योजना यशस्वीपणे राबविल्या गेल्याने पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देण्यासाठी 90 90 90 20 24 या मोबाईल नंबर वर मिस कॉल करण्याचे आव्हान करण्यात आले.
तसेच रावेर विधानसभा मतदारसंघातील लाभार्थ्यांना, नागरिकांना,शेतकऱ्यांना, विद्यार्थी विद्यार्थिनींना काही अडीअडचणी असल्यास शासन दरबारी त्याचा पाठपुरावा करून त्यांना मार्गदर्शन व सहकार्य केले जाणार असल्याची माहिती सुद्धा रावेर विधानसभा क्षेत्र प्रमुख अमोलदादा जावळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
टिप्पणी पोस्ट करा