यावल पोस्टात महिला सन्मान बचत पत्र योजनेला महिलांकडून उत्तम प्रतिसाद. मोठ्या प्रमाणात जनजागृती झाल्याने भुसावळ भाग डाक अधीक्षक कुंदन जाधव यांनी कर्मचाऱ्यांचे केले कौतुक.

यावल दि.22
भारतीय डाक विभागाने 17 जून 2023 पासून महिला सन्मान बचत योजना सुरू केली आहे,पोस्ट ऑफिस भुसावळ भाग भुसावळ डाक अधीक्षक कुंदन जाधव व इतर सर्व अधिकाऱ्यांच्या  मार्गदर्शनाखाली यावल पोस्टातर्फे यावल शहरात व यावल उपविभागात निरीक्षक डाकघर यावल उपविभाग भूषण अरुण सैंदाणे यांनी आपल्या पोस्ट कार्यालयातील महिला पोस्टमन कर्मचाऱ्यांसह कार्यालयातील पोस्टमास्तर व इतर सर्व कर्मचाऱ्यांनी यावल शहरात व ग्रामीण भागात घरोघरी जाऊन महिला सन्मान बचत पत्र योजनेबाबत महिलांना माहिती दिली यात त्यांना अनेक महिलांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असल्याने अनेक महिलांनी यावल पोस्टात महिला सन्मान बचत पत्र खाते उघडले.            खास महिलांकरिता बचतीची आणि सर्वात जास्त व्याजदराची नवीन योजना सुरू केल्याने देशातील महिलांचा गुंतवणुकीत सहभाग वाढवण्यासाठी आणि त्यांना आर्थिक दृष्ट्या बळकट करण्यासाठी सरकारने देशभरातील सर्वच डाकघरात महिला सन्मान बचत योजना सुरू केली आहे.या योजनेचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा
असे आवाहन यावल पोस्टमास्टर इक्बाल तडवी यांच्यासह तालुक्यातील ग्रामीण भागातील पोस्टातील पोस्टमास्तर व पोस्टमन व सर्व कर्मचारी यांनी महिलांची प्रत्यक्ष भेट घेऊन महिला सन्मान बचत पत्र याविषयी सविस्तर माहिती दिली व त्यांनी सर्व महिलांना जास्तीत जास्त महिला बचत सन्मान खाती उघडावी याबद्दल आवाहन केले.ज्यामध्ये केवळ महिलाच गुंतवणूक करू शकतात.महिला सन्मान बचत प्रमाणपत्रावर केवळ दोन वर्षात ७.५ टक्के व्याज दिले जाईल.महिला सन्मान बचत योजना ही एक वन टाइम गुंतवणूक करण्याची योजना आहे.यावल पोस्ट ऑफिसचे पोस्ट मास्तर इकबालखा तडवी व त्यांचे सहकारी कर्मचारी महिलांना सन्मान बचत पत्र योजनेची माहिती व महत्त्व पटवून देत असल्याने महिलांनी यावल पोस्टात व आपापल्या गावातील पोस्टात महिला सन्मान बचत पत्र खाते उघडले आज गुरुवार दि. 22 जून 2023 रोजी भुसावळ भाग भुसावळ टाक अधीक्षक कुंदन जाधव यांनी यावल पोस्टात आज अचानक भेट देऊन महिला सन्मान बचत पत्र योजनेबाबत कामाचा आढावा घेऊन पोस्ट कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करून सुरू असलेल्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करून पोस्ट कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
----------------------------------------------
Mahila Samman Bachat Patra Yojana भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सन 2023 च्या बजट माध्यमाने अमलात आणली आहे, या योजनेच्या अंतर्गत सरकारने महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. महिला सन्मान बचत योजना मध्ये ज्या स्त्रिया महिला अर्ज करतील, त्यांना 2 लाखांच्या बचतीवर 7.5% एवढा व्याज दर मिळणार आहे.
----------------------------------------------

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात