प्रभाग क्र.3 मध्ये रस्ते, गटारी नसल्यामुळे पावसाळ्यात नागरिकांना मोठा त्रास.


यावल दि.30
नगरपरिषद हद्दीत प्रभाग क्र. 3 मधील काही भागात रस्ते गटारी नसल्यामुळे ऐन पावसाळ्यात शाळेत जाणाऱ्या मुला मुलींना आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे गेल्या 2/3 वर्षात वारंवार लेखी तक्रारी केल्यावर सुद्धा नगरपालिकेने दखल न घेतल्याने कार्यकर्त्यांनी आता आंदोलनाचा इशारा दिला आहे.
      यावर नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्याकडे आज दि.30जून 2023 रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,गणपती नगर,
आयेशानगर,तिरुपतीनगर,वासुदेवनगर, गंगानगर या भागात रस्ते गटारी नसल्यामुळे तसेच नगरसेवक आणि माजी नगराध्यक्ष यांच्यासह यावल नगरपरिषद मुख्याधिकारी यांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे तसेच नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देत नसल्याने ऐन पावसाळ्यात शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच विविध कामानिमित्त नागरिकांना जाण्या येण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे तरी आपण तात्काळ दखल घेऊन कार्यवाही करावी अन्यथा 15 जुलै 2023 नंतर केव्हाही ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा मोहम्मद अशपाक शहा,अशपाक शहा गफार शहा,शेख अयाजोद्दीन शेख शहाबोद्दीन,शेख नजीब शेख वाहेद,शेख दानिश शेख आसिफ,
आमिर खान सुभान खान,शेख अनीस शेख हमीद,सद्दाम शहा रहेमान शहा,महेमुद खान हबीब खान,वसीम सिकंदर पटेल,हाबीज खान हाजी रउफ खान यांनी दिला आहे यावल नगरपरिषद मुख्याधिकारी यावल नगर परिषद बांधकाम विभाग काय कार्यवाही करतील याकडे प्रभाग क्र. 3 मधील नागरिकांचे  लक्ष वेधून आहे.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात