यावल दि.25
आज रविवार दि. 25 रोजी हिंदू राष्ट्र सेनेच्या काही कार्यकर्त्यांनी यावल पोलीस स्टेशनला आणि संबंधितांना गुप्त खबर दिल्यावरून दुपारी 13.30 वा.चे सुमारास यावल पो.स्टे.हद्दीतील चोपडा रोडवरील
ख्वाजा मशीदचे पाठीमागील तीन पत्री शेडमध्ये एकूण 16 गोवंश जातीचे प्राणी ( गाय गोरा बैल )अंदाजे किंमत 1 लाख 58 हजार रुपये किमतीचे अवैधरित्या कत्तलीच्या इराद्याने त्यांना पुरेसा चारा व पाण्याची व्यवस्था न करता अत्यंत दयनीय अवस्थेत बांधून ठेवलेल्या स्थितीत मिळून आल्याने यावल पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे.यामुळे यावल तालुक्यासह भुसावळ विभागात मोठी खळबळ उडाली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की सहाय्यक फौजदार असलम खान दिलावर खान यांनी यावल पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की दि. 25/ 6/ 2023 रोजी दुपारी 13:30 वाजेच्या सुमारास सहायक पोलीस निरीक्षक विनोद कुमार गोसावी,पोलीस उपनिरीक्षक अविनाश दहिफळे,सहाय्यक फौजदार मुजफ्फरखान, युनिस तडवी,नितीन चव्हाण, सिकंदर तडवी,सुशील घुगे, अल्लाउद्दीन तडवी,विनोद चौधरी असे यावल पोलीस स्टेशन येथे हजर असताना पोलीस निरीक्षक यांनी त्यांचे केबिनमध्ये बोलावून सांगितले की,चोपडा रोडवरील ख्वाजा मशीदचे पाठीमागील पत्री शेडच्या गोडावुनमध्ये
1) जाकीर खान साबीर खान 2 ) उस्मान शेख सुलतान, 3) शकील खान निसार खान कुरेशी यांनी अवैधरीत्या गुरांची कत्तल करण्याचे उद्देशाने गोवंश जातीचे गुरे दोरीने जखडुन बांधलेली आहे,आपणास सदर ठिकाणी जावुन कायदेशीर कारवाई करणे असल्याने तुम्ही माझे सोबत चला,असे कळविले वरुन पो.उ.नि.अविनाश दहिफळे यांनी लागलीच दोन पंचांना पोलीस स्टेशनला बोलावुन घेवून त्यांना वर प्रमाणे बातमी कळवुन पंच हे स्वखुशीने पंच म्हणुन हजर राहण्यास तयार झाल्याने आम्ही कारवाई कामी लागणारे साहीत्य सोबत घेवुन आम्ही वर नमुद पोलीस स्टाफ,पंच व स्वतः पोलीस निरीक्षक सो। असे आम्ही सरकारी वाहन व खाजगी वाहनाने मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी चोपडा रोडवरील ख्वाजा मशीदचे पाठीमागील पत्री शेडचे गोडावुनमध्ये जावुन बघितले असता सदर ठिकाणी
तीन पत्री शेडमध्ये एकुण 16 गुरे हे दोरीने घट्ट बांधुन ठेवलेले,त्यांना पुरेसा चारा व पाण्याची व्यवस्था न करता अत्यंत दयनीय अवस्थेत कत्तल करण्याचे उद्देशाने बांधुन ठेवलेले दिसले.सदर गुरांचे वर्णन खालील प्रमाणे,
1)10,000/- रुपये किंमताची एक लाल रंगाचा गोन्हा, शिंगे लहान, दोन्ही कान मोठे,वय अंदाजे 4 वर्ष,काठेवाडी जातीचा, शेपटीचा गोंडा लाल किं.अं.
2)12,000/- रुपये किंमताची एक लाल भुरकट रंगाचा गोन्हा, वय अंदाजे 3 वर्ष, गावरान जातीचा, शेपटीचा गोंडा काळा, कानावर पिवळा टॅग
3)10,000/- रु. किं.चा एक लाल भुरकट रंगाचा गोहा, कपाळावर पांढरा पट्टा असलेला,
शिंगे असलेला, वय अंदाजे 3 वर्ष, गावरान जातीचा किं.अं.
4)10,000/- रु. किं.चा एक लाल रंगाचा त्यावर पांढरे ठिपके असलेला, लहान शिंगे बाहेरील बाजूस निघालेली वय अंदाजे पाच वर्षे गावरान जातीचा.
5) 8,000/- रु. किं. चा एक भुरकट रंगाचा बैल, तोंडावर पांढऱ्या रंगाचा पट्टा असलेला, लहान शिंगे असलेला, वय अंदाजे 7 वर्ष, गावरान जातीचा किं.अं.
6) 12,000/- रु. किं. चा एक लाल भुरकट रंगाचा गोन्हा, फाटे शिंगे असलेला,
कानात पिवळा टॅग,वय अंदाजे 7 वर्ष, गावरान जातीचा किं.अं.
7) 8,000/- रु. किं. चा एक लाल पांढऱ्या रंगाची गाय, गोल शिंगे असलेली, वय अंदाजे 11 वर्ष,गावरान जातीची किं.अं.
8) 8,000/- रु. किं. ची लाल पांढऱ्या रंगाचा गोऱ्हा, लहान शिंगे असलेला, वय अंदाजे 3 वर्ष, गावरान जातीचा किं.अं.
9) 8,000/- रु. किं. चा एक लाल काळ्या रंगाचा गोन्हा, लहान शिंगे असलेला, वय अंदाजे 4 वर्ष, गावरान जातीचा किं.अं.
10) 8,000/-रु. किं. ची एक लाल भुरकट रंगाची गाय, लहान शिंगे असलेली, वय अंदाजे 9 वर्ष, गावरान जातीची किं.अ.
11) 8,000/- रु.किं. ची लाल रंगाचा तोंडावर पांढरा पट्टा असलेला गोन्हा, लहान शिंगे असलेला, वय अंदाजे 4 वर्ष, गावरान जातीचा किं.अं.
12) 12,000/- रु. किं. चा एक पांढऱ्या रंगाचा त्यावर लाल ठिपके असलेला बैल, शिंगे मध्यम असलेला, वय अंदाजे 7 वर्ष, गावरान जातीचा किं. अं.
13) 12,000/- रु. किं. चा एक लाल पांढऱ्या रंगाचा बैल, लांब शेपटी असलेला, मोठी शिंगे
असलेला, वय अंदाजे 6 वर्ष, गावरान जातीचा किं. अं.
14) 10,000/-रु. किं. एक लाल रंगाचा गोऱ्हा, शिंगे मागे वळलेले, वय अंदाजे 3 वर्ष, गावरान जातीचा किं. अं.
15) 12,000/- रु.किं. ची एक तपकीरी रंगाची गाय, शिंगे मोठे असलेली, वय अंदाजे 6 वर्ष,
गावरान जातीची किं.अं.
16) 10,000/- रु. कि. ची एक भुरकट रंगाची गाय, लहान शिंगे असलेली, वय अंदाजे 8 वर्ष,
.गावरान जातीची किं.अं. एकूण किंमत
1,58,000/ आहे अवैधरीत्या आढळून आल्याने यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांनी समय सूचकता बाळगून यावल पोलिसांना गुप्त खबर दिल्यामुळे आज 16 'गो' वंशाचे जीव वाचले त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे आणि पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे संपूर्ण यावल तालुक्यासह भुसावळ विभागात मोठी खळबळ उडाली.
टिप्पणी पोस्ट करा