यावल दि.२ भुसावल यावल रोडला लागून असलेल्या अकलूद शिवारातील पोदार इंटरनेशनल स्कूलमध्ये १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद हजर होते. महाराष्ट्राच्या गाथा सांगणाऱ्या लक्षवेधी गाण्यांनी शाळेचा परिसर दुमदुमला होता.कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे प्राचार्य आनंद हिरालाल शाह यांनी ध्वज फडकावून भाषणात महाराष्ट्र हे महान राष्ट्र आहे. या मातीत थोर संत महापुरूष जन्माला आले अश्या थोर भूमीला शतशः प्रणाम करून कामगार दिना निमित्त उपस्थितांना सुभेच्छा दिल्या.शिक्षकांमधून रेखा मुळे,मनीषा दलाल,अंजली कुलकर्णी,मीनाक्षी तायडे, शाळेचे व्यवस्थापक रामदास कुळकर्णी यांनी महाराष्ट्र दिनाबद्दल आपले विचार मांडले.सोनाल ओहोळ यांनी उपस्थितांचे आभार मानले.शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने एकमेकांना कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
टिप्पणी पोस्ट करा