यावल दि.२
'बोले तैसा चाले,त्याची वंदावी पावले' या उक्तीप्रमाणे स्पर्धकांनी वक्तृत्व सादर करताना महापुरुषाचे जे विचार मांडले ते त्यांनी आचरणात आणावे असे मत बहुजन जागृती मंच भुसावळ तर्फे आयोजित बक्षीस वितरण कार्यक्रमात मान्यवरांनी व्यक्त केले. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती उत्सव निमित्त आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा दि.३० एप्रिल २०२३ रोजी पु.ओ. नाहाटा महाविद्यालय येथे संपन्न झाला.
विचार मंचावर अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वसंत जंजाळे,प्रमुख पाहुणे भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, उपविभागीय पाणीपुरवठा अभियंता सुभाष लोखंडे, किशोर सपकाळे (आयुध निर्माणी),नायब तहसीलदार शशिकांत इंगळे प्रा.डॉ. अनिल हिवाळे,माध्यमिक मुख्याध्यापक संघ तालुकाध्यक्ष जे.पी. सपकाळे,सेवानिवृत्त केंद्रप्रमुख वसंत सोनोने, केंद्रप्रमुख विलास तायडे, स्पर्धा समन्वयक आनंद सपकाळे स्पर्धा प्रमुख देव सरकटे उपस्थित होते.स्पर्धेत सहभागी ११२ वक्तृत्वाचे १४ परीक्षकांनी परीक्षण केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात बहुजन जागृती मंचचे अध्यक्ष राजेंद्र सुरवाडे यांनी मंच द्वारे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाबद्दल माहिती दिली. प्रमुख पाहुणे भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड,सुभाष लोखंडे, प्रा. डॉ.अनिल हिवाळे यांनी स्पर्धकांना मार्गदर्शन केले.
गटानुसार विजेते स्पर्धक
वक्तृत्व स्पर्धेत पहिल्या गटात प्रथम क्र.अनुश्री अनिल चौधरी (गु.प.वि पाटील विद्यालय जळगाव),द्वितीय क्र.गार्गी ललितकुमार भोळे (सेंट आलायसेस भुसावळ), तृतीय क्र. प्रज्ञा किरण सुरवाडे (केंद्रीय विद्यालय वरणगाव),उत्तेजनार्थ कोमल विजय कोळी (जि.प.शाळा सांगवी खुर्द ता.यावल)
दुसऱ्या गटात प्रथम क्र. हर्षाली विलास बनकर (जि. प.शाळा लोहारा ता. पाचोरा),स्तव्य कमलेश शामकुवर (पोदार इंटरनॅशनल भुसावळ),तृतीय क्र.समृद्धी सचिन भास्कर (कमल राजाराम वाणी विद्यालय जळगाव), उत्तेजनार्थ इशिका प्रमोद देशमुख (जि.प.शाळा लोहारा ता.पाचोरा) गट क्र.3मध्ये प्रथम क्र. हंसिका नरेंद्र महाले (सेंट अलायसिस हायस्कूल) द्वितीय क्र.सिद्धी मंगलेश पाटील (सेंट आलायसिस हायस्कूल),तृतीय स्वप्निल भाऊसाहेब पाटील (जि.प. शाळा सांगवी ता.पारोळा), उत्तेजनार्थ साक्षी किरण चौधरी (श्री बालाजी प्राथमिक विद्यालय पारोळा),
चौथ्या गटात प्रथम क्र. कोमल चंद्रकांत शिरसाळे (दादासाहेब दामू पांडू पाटील विद्यालय सुनसगाव),द्वितीय कुलदीप रवींद्र पाटील (सेंट अलायसिस हायस्कूल), तृतीय खुशी गजानन मोरे (महात्मा गांधी विद्यालय वरणगाव),उत्तेजनार्थ किरण विजय साळवे (दादासाहेब आर.जी.झांबरे विद्यालय भुसावळ),पाचव्या गटात प्रथम क्र.अंकिता दिलीप गजरे (सरस्वती विद्या मंदिर व कनिष्ठ विद्यालय यावल), द्वितीय चेतना पितांबर पाटील (नाहाटा महाविद्यालय),तृतीय विवेक पितांबर पाटील (नाहाटा महाविद्यालय), उत्तेजनार्थ सायली गणेश महाजन (नाहाटा महाविद्यालय)
यश मिळवणाऱ्या स्पर्धकांना सन्मानपत्र,स्मृतीचिन्ह,रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले.यादी वाचन कमलेश शामकुवर,नरेश बाविस्कर, रवींद्र मसाने यांनी केले.
१४ परीक्षकांनी केले परीक्षण
ऑनलाइन व ऑफलाइन स्पर्धेचे परीक्षक विजय झोपे, धम्मरत्न चोपडे,संध्या भोळे, प्रा.संदीप नेतनवार,जीवन महाजन,प्रा.निलेश गुरचळ, दीपक पाटील,प्रा.गौतम भालेराव,समाधान जाधव, महेंद्र मेढे,अरविंद पाटील, अलका भटकर,प्रा.श्रीकांत जोशी,नितीन भालेराव यांचा सन्मानपत्र व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.नाहाटा महाविद्यालयाचे चेअरमन महेश फालक,गटप्रमुख रुपेश मेश्राम क्रांती वाघ,प्रमोद खैरे, भारती अवचारे,महेंद्र मेढे, शैलेंद्र महाजन,तेजेंद्र महाजन,भूषण झोपे,रवींद्र पाटील,दीपक इंगळे यांचे सहकार्य लाभले.सूत्रसंचालन महेंद्र मेढे तर आभार देव सरकटे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गटप्रमुख,परीक्षक,बहुजन जागृती मंचच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
टिप्पणी पोस्ट करा