यावल दि.19
त्र्यंबकेश्वर मंदिरात कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या महादेवास काही धर्मांधांकडून हिरवी शाल घालण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राज्य संघटक सुनील घनवट यांनी दि.15 मे 2023 रोजी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री यांना लेखी निवेदन सादर केले आहे.त्याच अनुषंगाने दि.19 रोजी यावल तहसीलदार यांच्याकडे स्थानिक कार्यकर्त्यांनी निवेदन दिले.
स्थानिक ऊरुसाच्या निमित्ताने निघालेल्या
मिरवणुकीत काही धर्मांधांनी उत्तर महाद्वार येथून श्री त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश करण्याचा हट्ट धरला.हे धर्मांध एवढ्यावर थांबले नाहीत, तर त्यांनी पिंडीवर हिरवी शाल चढवण्यासाठी आग्रह केला.तेथील सुरक्षा रक्षकांनी सदरच्या धर्मांधांना अडवल्याने पुढील अनर्थ टळला. वास्तविक पहाता श्री त्र्यंबकेवर मंदिरात घटनेप्रमाणे दर्शनाचे अधिकार हे हिंदु धर्मातील व्यक्तींनाच देण्यात आले आहेत.त्र्यंबकेश्वर येथील शंकराचे स्थान हे कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असून ही घटना गंभीर आहे.या प्रकारामुळे जाणीवपूर्वक सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.तरी या प्रकरणी संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी,अशी मागणी आम्ही करत आहोत.गेल्या काही दिवसांपासून अमरावती, संभाजीनगर,अकोला येथील घटना पहाता नाशिक येथील त्र्यंबकेश्वर मंदिराच्या संदर्भात झालेली घटना ही जाणीवपूर्वक सामाजिक तेढ वाढवणारी असून यातून कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचे मोठे षडयंत्र असू शकते.त्यामुळे या संदर्भात राज्यात अन्य कुठेही जबरदस्तीने असे प्रकार होत असतील तर तातडीने लक्ष घालून संबंधितांवर
कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावल येथील हिंदू जनजागृती समितीचे कार्यकर्ते लखन नाथ,योगेश वारुळकर,उज्वल कानडे,रितेश बारी,संदीप रेगे,राजेश बारी,सागर इंगळे,सागर फेगडे,पराग भोईटे,दीपक फेगडे,कोमल इंगळे,साहिल चव्हाण,स्नेहल फिरके,प्रथमेश घोडके, युवराज बारी यांनी यावल तहसीलदार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा