यावल- रावेर तालुक्यात शिवराज्याभिषेक दिन थाटात साजरा होणार : डॉ. कुंदन फेगडे. आश्रय फाउंडेशनतर्फे 2 जून पासून यावल,रावेर तालुक्यांत घरघर भगवा अभियान.



यावल दि.31
शिवराज्याभिषेक दिन जल्लोषात साजरा करण्याची तयारी यावल-रावेर तालुका कार्यक्षेत्र असलेल्या आश्रय फाउंडेशनतर्फे सुरू करण्यात आली असून, फाउंडेशनतर्फे दोन जूनपासून घरघर भगवा अभियान राबविले जाणार तसेच कोणतीही वयोमर्यादा नसल्याची अट टाकून शिवाजी महाराज यांच्या महान कर्तुत्वावर चित्रकला स्पर्धांचे आयोजन केले असल्याची माहिती अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे यांनी दिली.
         रायगड किल्ल्यावर 17जून1674 रोजी भव्य समारंभात श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा मराठा साम्राज्याचा (हिंदवी स्वराज्य) राज्याभिषेक झाला होता आणि आहे.या ऐतिहासिक कार्यक्रमाची माहिती आणि जनजागृती होण्यासाठी आश्रय फाउंडेशनतर्फे दोन जूनपासून यावल- रावेर तालुक्यात घरघर भगवा अभियान राबविण्यात येणार आहे.ऐतिहासिक संस्कृती जपणूक होईल आणि संस्कृती जपण्यासाठी तसेच शिवाजी महाराजांचा उज्ज्वल इतिहास नागरिकांना व भावी पिढीला ज्ञात व्हावा, त्यांचा आदर्श घेतला जावा म्हणून शिवरायांचा 350 वा राज्याभिषेक दिन यावल- रावेर तालुक्यांत साजरा करणार आहे. आठवडाभर दोन्ही तालुक्यांतील सर्व स्तरांतील महिला- पुरुष, तरुण-तरुणींनी घरासमोर सुंदर रांगोळी काढून रात्री दिवे लावून शिवरायांचा राज्याभिषेक दिन साजरा करावा, असे आवाहनही त्यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे महान वर्णन असलेल्या पत्रिका तसेच 21 हजार भगवे ध्वज, स्टिकर्स, कार्यपत्रिकेचे वाटप करून शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा केला जाणार असल्याची माहिती डॉ.फेगडे यांनी दिली.
|| शिवराज्याभिषेक दिन -३५०वर्षेपूर्ती सोहळा ||
 हिंदु हृदय सम्राट,जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्याभिषेक दिनाच्या औचित्य साधून   मा.डॉ.कुंदन सुधाकर फेगडे  यांच्या संकल्पनेतून *चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले असून सदर स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान  केले आहे.
*बक्षीसे -:*
प्रथम बक्षीस २१००,द्वितीय बक्षीस ११००,तृतीय बक्षीस ५०१,(तसेच प्रत्येक सहभागी स्पर्धकास प्रमाणपत्र देण्यात येईल)असे आवाहन आश्रय फाउंडेशन तर्फे आयोजन डॉ. कुंदन सुधाकर फेगडे यांनी व त्यांचे सहयोगी सदस्य,मित्रपरिवाराने केले आहे.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात