यावल लोक अदालत मधे 23 दावे निकाली.

यावल दि.5
यावल न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोक अदालतित दाखल पूर्व तसेच प्रलंबित 23 दावे तडजोडीने निकाली काढण्यात आले.या लोक अदालतीत एकूण 797 प्रकरणे दाखल होती. निकाली प्रकरणांमुळे वित्तीय संस्थांचा तसेच संबंधितांचा जास्त कालावधी वाया न जाता 24 लाख 93 हजार 538 रुपयांचा वसूल मिळाला.
      प्रथम वर्ग न्यायाधीश एम.एस.बनचरे,एडवोकेट डी.सी.सावकारे,आणि समांतर विधी सहाय्यक नंदकिशोर अग्रवाल असे 3 सदस्य पॅनल नेमले होते. दाखल पूर्व 538 फौजदारी 186 आणि दिवाणी न्यायालयाच्या 73 केसेस अशी एकूण 797 प्रक्रिया पॅनल समोर ठेवले होते. त्यातील दाखल पूर्व दोन केसेस निकाली काढल्या. यात वित्तीय संस्था व विविध बँकांना 3 लाख वीस हजार रुपयांचा वसूल मिळाला. दिवाणी व फौजदारी 29 केसेसचा निपटारा झाला. त्यात 21 लाख 73 हजार 538 रुपयांचा वसूल मिळाला.या राष्ट्रीय लोकअदा लत मधे दाखल पैकी 23 केसेस निकाली निघून एकूण 24 लाख 93 हजार 538 रुपयांचा वसूल मिळाला.या लोक अदालतीसाठी वकील अनुक्रमे ए.आर.सुरळकर, जी.एम.बारी,एस.जी.कवडी वाले, ए.एम.कुलकर्णी,एस. आर.लोंढे,उमेश बडगुजर, धीरज चौधरी,एम.पी.पाटील. यांनी वादी व प्रतिवादी यांच्या बाजूने काम पाहिले.
  लोकअदालती साठी न्यायालयीन कर्मचारी एस.बी.शुक्ल,एस.जे.ठाकूर,सी.एम.झोपे,    जी.एस.लाड,डी.ए.गावंडे,ए.बी.बागुल,पी.डी. चव्हाण,डी.आर.पाटील,एम डी.जोशी,आर.डी.गोराने यांनी परिश्रम घेतले.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात