यावल दि.4
यावल - रावेर तालुक्यात जिल्हा परिषद जळगाव तसेच रावेर पंचायत समिती आणि यावल पंचायत समिती कार्यालयातर्फे म्हणजे जिल्हा परिषद बांधकाम उप अभियंता यांच्या कार्यक्षेत्रात अनेक झालेल्या बांधकामात बनावट दस्तऐवज तयार करून ठेकेदारांना बिल अदा करण्यात येत आहे यात महत्त्वाचा भाग म्हणजे बांधकामाबाबतचे टेस्ट रिपोर्ट संबंधितांकडून प्रत्यक्ष खात्री न करता टेस्ट रिपोर्ट दिले जात असल्याने बांधकामासह विविध कामांच्या गुणवत्तेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
जिल्हा परिषद जळगाव कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग यांच्या कार्यक्षेत्रातील यावल रावेर तालुकास्तरीय उपविभागीय बांधकाम विभाग रावेर येथे आहे,यावल आणि रावेर पंचायत समिती मार्फत तालुक्यांमध्ये रस्ते,गटारी नाला बांध,सिमेंट बंधारे, गुरांचे गोठे,स्मशानभूमी, भूमीगत गटारी,सार्वजनिक शौचालय,सामाजिक ग्रामपंचायत कार्यालये प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील व इतर अनेक बांधकामे मंजूर इस्टिमेट प्लॅन प्रमाणे न करता संबंधित ठेकेदार त्यांच्या मर्जीनुसार सोयीनुसार करीत आहे या कामांची प्रत्यक्ष पाहणी आणि खात्री संबंधित उपअभियंता,कनिष्ठ अभियंता,शाखा अभियंता कोणत्या प्रकारे करतात ? आणि यात काही इंजीनियरिंग कॉलेज मार्फत बांधकामाचे टेस्ट रिपोर्ट दिले जातात ते टेस्ट रिपोर्ट प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन खात्री न करता दिले जात असल्याने,तसेच ज्या ठेकेदारांकडे बांधकामाचे पूर्ण साहित्य,मशिनरी नसताना आणि वाळू बाबत अधिकृत परवाने नसताना बांधकामाचे ठेके दिले जातात याबाबत यावल व रावेर तालुक्यात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एक चौकशी समिती नेमून यावल- रावेर तालुक्यात जिल्हा परिषद, यावल व रावेर पंचायत समिती मार्फत झालेल्या संपूर्ण बांधकामांची सविस्तर चौकशी केल्यास मोठा घोळ आणि गैरप्रकार उघडकीस आल्याशिवाय राहणार नाही असे यावल आणि रावेर तालुक्यात बोलले जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा