यावल - रावेर तालुक्याचे जिल्हा परिषद बांधकाम विभाग प्रमुख कार्यालय रावेर येथे आहे. रावेर येथील उप अभियंता सेवानिवृत्त झाले असल्याने त्यांचा पदभार यावल येथील शाखा अभियंता यांच्याकडे दिला आहे.
यावल पंचायत समिती कार्यालयातील जिल्हा परिषद बांधकाम विभागातील शाखा अभियंता यांच्याकडे यावल पंचायत समिती बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता म्हणून तसेच जिल्हा परिषद बांधकाम विभाग रावेर बांधकाम विभाग कार्यालयातील उप अभियंता म्हणून पदभार असल्याने एकूण 3 पदाचा आणि यावल रावेर तालुक्यातील जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील बांधकाम विभागाचा कारभार एकच व्यक्ती सांभाळत असल्याने त्यांच्या कार्यक्षमतेबाबत आणि जिल्हा परिषद जळगाव बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता यांच्यासह यावल रावेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी जो निर्णय घेतला आहे त्याबाबत यावल- रावेर तालुक्यात बांधकाम विभागातील संबंधित ठेकेदार आणि राजकारणात कौतुकास्पद रित्या बोलले जात आहे.
तीन पदाचा कार्यभार एकच शाखा अभियंता सांभाळत असल्याने जिल्हा परिषदेच्या विविध बांधकामाच्या गुणवत्तेबाबत
यावल रावेर तालुक्यातील सर्व ग्रामसेवक ठेकेदार लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयाबाबत कौतुकास्पद रित्या बोलले जात आहे.
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी यावल रावेर तालुक्यातील बांधकाम विभागातील पदभार देण्याचा पॅटर्न संपूर्ण जळगाव जिल्ह्यात राबविल्यास जळगाव जिल्हा परिषदेला राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याशिवाय राहणार नाही असे सुद्धा बोलले जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा