डॉ.कुंदन फेगडे यांना 'साईरत्न पुरस्कार' प्रदान. माजी माहिती आयुक्त व्ही. डी.पाटील साहेब यांनी केला सन्मान.

जळगाव दि.15
रावेर-यावल विधानसभा कार्यक्षेत्रात वैद्यकीय सामाजिक,राजकीय शैक्षणिक,सांस्कृतिक आणि धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून आपल्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटविणाऱ्या यावल येथील डॉ.कुंदन सुधाकर फेगडे यांना दैनिक साईमत तर्फे आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत माजी माहिती आयुक्त साहेब व्ही.डी.पाटील साहेब यांच्या शुभहस्ते 'साईरत्न पुरस्कार' देऊन त्यांना त्यांच्या अर्धांगिनी पत्नीसह सन्मानित करण्यात आले यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे आयोजक तथा साईमत मीडियाचे संचालक प्रमोद बराटे,अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन,भुसावळ येथील तज्ञ डॉ.सुरेंद्र भिरूड उपस्थित होते.साईरत्न पुरस्कार वितरण सोहळा शनिवार दि.15 एप्रिल 2023 रोजी संध्याकाळी 7  वाजता परेश हॉलिडे रिसोर्ट येथे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात