यावल शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी.



यावल दि.14
आज शुक्रवार दि.14 एप्रिल म्हणजेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असल्याने यावल येथील सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये संस्थाचालक व शिक्षक वृंदांनी मोठ्या उत्साहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली,या निमित्त सर्वात प्रथम मिलिंद भालेराव सर व सौ.शिला तायडे मॅडम यांच्या हस्ते भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.संस्थाध्यक्ष राजेंद्र महाजन सर यांच्या अध्यक्षतेखाली प्रशांत फेगडे सर यांच्यासह सर्व शिक्षकवृंद व कर्मचारीवर्ग या वेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात