यावल दि.27
यावल कृषी उत्पन्न बाजार समिती पंचवार्षिक निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेची
जय्यत तयारी केली असली तरी काही उमेदवारांनी आपल्याला मतदारांनी मत दिले आहे किंवा नाही याची प्रत्यक्ष खात्री करण्यासाठी मतदाराने स्वतः मतदान केंद्रात दिनांक 28 एप्रिल 2023 रोजी उमेदवाराच्या चिन्हावर फुली मारताना निशाणी करतानाचा फोटो आपल्या मोबाईल मध्ये काढून तो फोटो ज्याला मतदान केले त्या काही ठराविक उमेदवारांना दाखविल्यास 5 ते 10 हजार रुपये दिले जातील अशी चर्चा यावल तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या काही एक दोन मतदार संघातील मतदारांमध्ये सुरू झाली आहे,मतदान केंद्रात मतदाराला मोबाईल सह प्रवेश आहे किंवा नाही याबाबतची जागृती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केली आहे का..? मतदाराला मतदान केंद्रात मोबाईल नेता येणार आहे का..? याचा खुलासा कोण करणार.? याबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदारांमध्ये जोरदार चर्चा सुरू असली तरी निवडणूक निर्णय अधिकारी निश्चित केलेल्या मतदान केंद्रावर मतदान करतानाचे छायाचित्र काढू नये म्हणून काय कारवाई करणार आहे याकडे सुद्धा सर्वांचे लक्ष वेधून आहे.
काँग्रेसचा एक माजी जिल्हा परिषद सदस्य कृषी उत्पन्न बाजार समिती यावल कार्यक्षेत्रात पश्चिम व पूर्व भागात आणि पूर्व भागातील काँग्रेस पक्षाचा कट्टर समर्थक सहकार क्षेत्रातील माजी लोकप्रतिनिधी हे खास करून भाजपा प्रणित सहकारी पॅनल मधील काही ठराविक उमेदवारांना निवडून आणण्यासाठी सक्रिय प्रयत्न करीत असल्याने राजकारणात यांच्याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे.
टिप्पणी पोस्ट करा