अट्रावल दंगल प्रकरणी 205 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. 4 वेगवेगळ्या गुन्ह्यतील 17 जणांना पोलीस कोठडी.

यावल दि.3
तालुक्यातील अट्रावल येथे शनिवार दि.1 एप्रिल रोजी झालेल्या दगडफेक व दंगल प्रकरणात एकूण 205 जणांविरुद्ध यावल पोलीस स्टेशनला वेगवेगळे 4 गुन्हे दाखल करण्यात आले असून यातील एकूण 17 जणांना अटक करण्यात आली असून यातील 8 जणांना यावल न्यायालयाने 5 एप्रिल पर्यंत 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली तर ॲट्रॉसिटी गुह्यातील 9 जणांना भुसावळ न्यायालयाने दि.6 एप्रिल पर्यंत पाच दिवसाची पोलीस कोठडी दिली.
         याबाबत सविस्तर माहिती अशी की अट्रावल येथील दिवाकर तायडे यांनी फिर्याद दिल्यानुसार 25 जणांविरुद्ध ॲट्रॉसिटी व इतर कलमान्वये दाखल गुन्ह्यातील 9 जणांना अटक केली असता भुसावळ न्यायालयाने 6 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी दिली.
       तर दुसऱ्या प्रकरणात विजय प्रभाकर कोळी यांच्या फिर्यादीवरून 57 ज्ञात व 25 अज्ञात संशयीता विरुद्ध दंगलीसह विविध कलमानुसार गुन्हा दाखल झाला आहे.
      3 रा गुन्हा अट्रावल गावात शांतता प्रस्थापित करताना शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून पी.एस.आय.सुनीता कोळपकर यांनी फिर्याद दिल्यावर एकूण 93 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक सुदाम काकडे करीत आहे.
        तर चौथ्या प्रकरणात हवालदार अशोक बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून 4 जणांविरुद्ध आर्म एक्ट नियमानुसार गुन्हा दाखल झाला या गुन्ह्यातील 4 आणि दंगलीच्या गुन्ह्यातील 4  अशा 8 जणांना यावल न्यायालयाने 5 एप्रिल पर्यंत चार दिवसाची पोलीस कोठडी दिली.तसेच ॲट्रॉसिटी सह विविध कलमान्वये दाखल गुन्ह्यातील 9 जणांना भुसावल न्यायालयाने 6 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
       उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्यासह  फैजपूर येथील सहाय्यक निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर, अविनाश दहिफळे यांच्यासह दंगल विरोधी पथक व पोलीस दल तैनात करण्यात आले आहे, सध्या अट्रावल गावात तणावपूर्ण शांतता आहे प्रशासनातर्फे पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसविला आहे, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांनी केले आहे.
-------------------------------------------------------
गोपनीय विभाग आणि खबऱ्यांबाबत संशय.
     जळगाव जिल्ह्यात आणि यावल तालुक्यात वाढती गुन्हेगारी,दंगल,खून,अवैध धंदे इत्यादी घटना लक्षात घेता पोलिसांचे गोपनीय खाते आणि त्यांच्या खबऱ्या बाबत सर्व स्तरातून संशय व्यक्त केला जात असल्याने पोलीस अधीक्षक जळगाव यांनी जिल्ह्यातील पोलीस कार्यक्षेत्रातील गोपनीय खात्यातील काही पोलीस कर्मचाऱ्यांच्या शासकीय कर्तव्याकडे लक्ष केंद्रित केल्यास पोलिसांना वेळेवर गोपनीय माहिती मिळून अप्रिय घटनांना आळा बसेल असे संपूर्ण यावल तालुक्यासह जळगाव जिल्ह्यात बोलले जात आहे.
--------------------------------------------------------

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात