जे.टी.महाजन इंग्लिश स्कूलमध्ये बाल आनंद मेळाव्यात बालकांना दिले व्यवहारिक ज्ञानाचे धडे.


यावल दि.10
आज दि.10 मार्च 2023 रोजी यावल येथील जे.टी महाजन इंग्लिश स्कूल मध्ये बाल आनंद मेळावा प्रमुख मान्यवरांसह बालक विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. 
       याप्रसंगी यावल येथील प्रसिद्धी माध्यमातील प्रतिनिधीची प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थिती होती शाळेच्या मुख्याध्यापिका रंजना महाजन व मान्यवरांनी कार्यक्रमाचा शुभारंभ श्रीगणेश पूजनाने केला. त्यानंतर शाळेच्या प्राचार्या श्रीमती रंजना महाजन यांनी  मुलांना आनंद मेळावाचे महत्व पटवून दिले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती दिपाली धांडे यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले. त्यानंतर आनंद मेळाव्याचे उदघाटन प्रमुख उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.आनंद मेळावा मध्ये पार्टिसिपेट झालेल्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचे स्टॉल लावून प्रमुख पाहुण्यांचे लक्ष वेधले.आनंद मेळावा घेण्याचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांना व्यवहारिक ज्ञानाची अनुभूती व्हावी यासाठी हा कार्यक्रम घेतला गेला.तसेच विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या खाद्यपदार्थाचे स्टॉल लावून खरेदी विक्रीचा आनंद आणि व्यवहारिक ज्ञानाचा अनुभव घेतला.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात