भुसावळ येथे ओपन ब्रेंच प्रेस, डेडलिफ्ट चॅम्पयनशिप स्पर्धा संपन्न. किनगाव येथील युवकांचा सहभाग.


यावल दि.14
भुसावळ येथे नुकत्याच झालेल्या ओपन ब्रेंच प्रेस,डेडलिफ्ट चॅम्पयनशिप मध्ये एवी फिटनेस जिम यांचे यश.
     दि.12 मार्च 2023 रोजी भुसावळ येथे ओपन ब्रेंच प्रेस,डेडलिफ्ट चॅम्पयनशिप चे आयोजन केले होते.सदर कार्यक्रमाचे आयोजन अमेच्युर पवार लिफ्टीन असोसिएशन जळगाव, जाकिरभाई पेंटर अध्यक्ष ७८६ ग्रुप महाराष्ट्र यांनी केले होते.यावेळी या स्पर्धेमध्ये एवी फिटनेस जिम किनगाव येथील युवकांनी सहभाग घेतला.यामध्ये 3 जण सहभागी झाले होते.त्यात दोन युवकांनी यश प्राप्त केले त्यात धीरज मगरे याने सुवर्ण पदक मिळविले व फैजन शाहा उर्फ लाला यांनी रोम्यपदक मिळवून यश प्राप्त केले.सदर युवकांना एवी फिटनेस जिम चे संचालक तेजस लांडगे यांनी योग्य असे मार्गदर्शन केले. यश संपादन केलेल्या युवकांचे सर्व स्तरातून अभिनंदन आणि कौतुक करण्यात येत आहे.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात