रावेर विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला यावल कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक लक्षात घेता यावल तालुक्यात काँग्रेसला अंजाळे गावातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या माध्यमातून खिंडार पडले असल्याचे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
तालुक्यातील भालोद येथे यावल कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुक संदर्भात भारतीय जनता पार्टी तर्फे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा व रणनीती आखण्यासाठी बैठक घेण्यात आली.मेळाव्यात भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजूमामा भोळे यांच्या उपस्थितीत अंजाळे तालुका यावल येथील ग्रामपंचायत उपसरपंच व विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन दीपक नरोत्तम चौधरी तसेच विविध कार्यकारी सोसायटीचे सदस्य शुभम पंडित चौधरी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला त्यांचा सत्कार भारतीय जनता पार्टीचे आमदार तथा जिल्हाध्यक्ष राजूमामा भोळे,अमोल जावळे,यावल तालुका अध्यक्ष उमेश फेगडे आदींनी केला हे कार्यकर्ते बाजार समिती मतदार संघातील असल्यामुळे या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे पारडे जड होण्याबाबतचे शुभ संकेत निर्माण झाले.याप्रसंगी अमोल जावळे हिरालाल चौधरी,शरददादा महाजन, नरेंद्र नारखेडे आदींनी कार्यकर्त्यांना संबोधित केले भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आमदार राजू मामाभोळे यांनी सुद्धा त्यांना एक संघ होऊन काम करा व पंधरा वर्षे आपल्या ताब्यात असलेली कृषी उत्पन्न बाजार समिती परत पूर्ण बहुमताने जिंकून आणा असे सांगितले कार्यक्रमाला अमोल हरिभाऊ जावळे,शरददादा महाजन, भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष उमेश फेगडे, डॉ.कुंदन फेगेडे,नारायण चौधरी,भरत महाजन,उज्जैन सिंग राजपूत,नरेंद्र विष्णू नारखेडे,योगेश भंगाळे, यावल तालुका पंचायत समितीच्या माजी सभापती पल्लवी चौधरी,कांचन पालक,हर्षल पाटील, हिरालाल चौधरी,माजी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील,माजी जिल्हा परिषद सदस्या सौ.सविता भालेराव, फैजपूर येथील पांडुरंग दगडू सराफ,जळगाव जिल्हा संचालक नितीन नारायण चौधरी,नरेंद्र कोल्हे,पुरुजित चौधरी,हे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नारायण चौधरी तसेच सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन तालुका सरचिटणीस विलास चौधरी यांनी केले.
-------------------------------------------------------
महाविकास आघाडीचा 'मी' पणा अजून गेला नाही.
रावेर विधानसभा मतदारसंघात म्हणजे यावल व रावेर तालुक्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आमदार शिरीषदादा चौधरी आहेत, आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या मागे त्यांच्या शैक्षणिक संस्थांचा आणि राजकारणाचा मोठा व्याप आहे,त्यांच्यासह काँग्रेस पक्षातील ठराविक पदाधिकारी व कार्यकर्ते सक्रिय आहेत पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार तालुक्यात विविध कार्यक्रम घेतले जातात परंतु प्रसिद्धीसाठी त्यांच्याकडे अधिकृत असा पदाधिकारी किंवा कार्यकर्ता नसल्याने प्रसिद्धी माध्यमांना प्रसिद्धी पत्रक वेळेवर दिले जात नाही किंवा व्हाट्सअप वर प्रसिद्धी पत्रक टाकल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधीशी समन्वय साधला जात नाही, पर्यायी पाहिजे त्या प्रमाणात महाविकास आघाडीच्या विविध उपक्रमांची प्रसिद्धी सर्व माध्यमातून होत नाही, त्यामुळे महाविकास आघाडीचे बरेच जनजागृती चे उपक्रम ग्रामीण भागातील व शहरी भागातील नागरिकांना कळून येत नसल्याने महाविकास आघाडीचा 'मी' पणा अजून गेला नाही का..? असे तालुक्यातील मतदारांमध्ये आणि नागरिकांमध्ये बोलले जात आहे.
--------------------------------------------------------
टिप्पणी पोस्ट करा