एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात कावळ्यांसह इतर पक्षांना पाणी पिण्याची व्यवस्था.



यावल दि.24
सुरू असलेल्या उन्हाळ्यात सध्या दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी पशु पक्षांचे हाल होत आहेत.पशु पक्षांचे होणारे हे हाल लक्षात घेऊन यावल येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या संरक्षक भिंतीवर कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी पशुपक्ष्यांसाठी पाणी पिण्यासाठी मातीच्या कुंडीत पाणी व त्यांना खाण्यासाठी बाजूला  धान्याचे दाणे याची व्यवस्था केली आहे.
  अशाप्रकारे इतरही ठिकाणी शासकीय,निमशासकीय कार्यालयाच्या परिसरात व खाजगी निवासस्थानी गच्चीवर किंवा घराच्या कंपाउंड भिंतीवर पक्षु पक्षी व वन्य प्राणी यांचे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केल्यास मुक्या प्राण्यांना मोठा दिलासा मिळेल व त्यांना तीव्र उन्हाळा जाणवणार नाही याचे समाधान मुक्या प्राण्यांना होणार आहे.
         यावल येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय हे जिल्हास्तरीय असल्याने उन्हाळ्यात म्हणजे मार्च अखेर तसेच एप्रिल,मे या महिन्यात जास्तीत जास्त तापमान राहत असल्याने जिल्ह्यातील शासकीय अनुदानित निवासी व बिनाअनुदानित आश्रम शाळेत ठिकठिकाणी पशुपक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व त्यांना काही प्रमाणात धान्य खाण्याची व्यवस्था केल्यास याचा आदर्श इतरही घेतील. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल कार्यालयातील हे लक्षवेधी आणि कौतुकास्पद कार्य आज शुक्रवार दि. 24 मार्च 2023 रोजी दुपारी चार ते पाच वाजेपर्यंत डोळे भरून मनसोक्त बघावयास मिळाले.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात