यावल शहरासह यावल मंडळात खाजगी व्यावसायिक तसेच शासकीय स्तरावरील अनेक ठिकाणी सिमेंट काँक्रीट इत्यादी साहित्याची अनेक कामे सुरू आहेत या ठिकाणी तसेच सार्वजनिक ठिकाणी वाळू प्रत्यक्ष दिसून येत असल्याने कोण म्हणतं यावल मंडळात अवैध वाळू वाहतूक आणि विक्री बंद आहे...? असे सर्व स्तरात बोलले जात आहे.
यावल एसटी स्टँड आवारात श्री काळभैरव यांच्या साक्षीने मंदिराच्या समोर सार्वजनिक वापराच्या ठिकाणी गेल्या महिनाभरापासून वाळू साठा प्रत्यक्ष सर्वांसमक्ष पडून आहे,याचप्रमाणे यावल शहरासह यावल मंडळात अनेक ठिकाणी सार्वजनिक व्यवसायिक आणि शासकीय स्तरावर अनेक बांधकामे सुरू आहेत या बांधकामाच्या ठिकाणी सर्रासपणे यावल परिसरातील नदी नाल्यांमधील वाळू तसेच तापी,गिरणा नदीतील वाळू डपर,ट्रॅक्टरच्या माध्यमातून सर्रासपणे अवैध वाहतूक करून येत असते यावल मंडळात तर एका ठिकाणी तापी नदी पात्र परिसरात व मोर नदी परिसरात जेसीपी,पोकलेंड इत्यादी मशनरीच्या माध्यमातून उत्खनन करून वाळू,माती आणि मुरुम ट्रॅक्टर आणि डंपरच्या माध्यमातून अवैधपणे वाहतूक सुरू आहे याकडे यावल मंडळ अधिकारी आणि तलाठी यांचे दुर्लक्ष होत आहे का ? आणि आतापर्यंत पकडले गेलेल्या ट्रॅक्टर,डंपर चालकांचा आढावा घेतला असता ठराविकच अवैध वाळू वाहतूकदारांची वाहने पकडली जाऊन त्यांच्यावर कार्यवाही झाल्याचे बोलले जात आहे तर ठराविक ओळखीच्या अवैध वाळू वाहतूक वाहनधारकांची वाहने कधीही पकडली गेली नसल्याचे आणि सामाजिक गणित लक्षात घेता काही वाहने एकदा सुद्धा पकडली गेली नसल्याचे यावल मंडळात बोलले जात आहे.
यावल मंडळातील नदी नाल्यां मधील वाळू उत्खनन आणि यावल शहरात विविध ठिकाणी येणारी वाळू यावल मंडळ अधिकारी आणि तलाठी यांना दिसून येत नसल्याने त्यांच्या कर्तव्याबाबत आणि हितसंबंधांबाबत यावल शहरात जोरदार चर्चा सुरू आहे भुसावल रोडवर लागून असलेल्या एका विकसित भागातून पिवळी माती अनाधिकृत पणे उत्खनन करून ती माती ट्रॅक्टर,डंपर वाले विक्री करून आपले व्यवसायिक उद्दिष्ट साध्य करीत आहेत याकडे सुद्धा महसूलचे दुर्लक्ष होत असल्याने प्रांताधिकारी, यावल तहसीलदार यांनी संयुक्तपणे पंचनामे करून कडक कारवाई करावी असे बोलले जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा