राहुरी तालुका भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलना तर्फे राजमाता जिजाऊ सहकारी पतसंस्थाच्या सर्व ठेवीदारांच्या ठेवी व्याजासह परत मिळणे कामी व इतर मागण्यां करीता आज दि. 15मार्च 2023 पासून राहुरी येथील सहायक निबंधक यांचे कार्यालयासमोर सकाळी 11 वाजेपासून बेमुदत आमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे.
सर्व ठेवीदारांनी सदर उपोषणात भाग घेवून आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन तालुका अध्यक्ष कुमार डावखर यांनी केले आहे.इतिहासाचे अवलेाकन केले असता, लक्षात येते की,जेव्हा लोकांवर अन्याय होतो, अत्याचार होतो,लुबाडणूक , फसवणूक होते,तेव्हा एक क्रांती उदयाला येते व लोक उठाव करतात.भारत देश इंग्रजांचा गुलाम होता,इंग्रज जतनेवर अन्वनीत अत्याचार करत होते,तेव्हा शेकडो, हजारो क्रांतीकारकांनी क्रांतीची मशाल पेटविली व रक्त सांडून, बलिदान देवून आपला देश स्वतंत्र् केला.
आपण इतिहासाचा अभ्यास केला असता असे लक्षात येते की,अन्याया विरुध्द प्रखर लढा दिला तर यश निश्चितच मिळते.
त्याच प्रमाणे साडे पाचशे ठेवीदारांच्या कष्टाने कमविलेल्यां करोडो रुपयांवर दिवसा ढवळया दरोडा टाकणा-या संचालकांविरुध्द जर आपण एकत्रीत पणे, चिकाटीने,सातत्याने लढत राहिलो,तर आपणास यश निश्चितच मिळेल आणि आतापर्यतची लढाई आपण लढून बराच लांबचा पल्ला ही गाठलेला आहे.तेव्हा कोणत्या ही ठेवीदाराने निराश हताश,निराश न होता धिर सोडता कामा नये आणि एक गोष्ट सगळयांनी लक्षात घ्यावयाची आहे,ती म्हणजे फक्त आपल्या ठेवी परत मिळवीणे एवढया पुरतीच ही लढाई आता मर्यादीत राहिलेली नाही.सर्व ठेवीदारांचे पैसे तर आपण मिळवूच,पण समाज सेवेचा बुरखा घेवून,श्री छत्रपती शिवाजी महाराज,जिजाऊ मॉसाहेबांचे नाव घेवून,जय व्यसन मुक्ती म्हणून हे भामटे समाजात वावरत होते, लोकांना भूलवित होते, आंम्ही फार मोठे समाज सेवक, प्रतिष्ठित नागरीक आहोत असे लोकांना भासवित होते,इतर लोकां पेक्षा वेगळे दिसण्यासाठी जाकीट व हॅट घालत होते, लोकही त्यांच्या अवसानाला भूलत होते,लोकांशी गोड बोलून या भामटयांनी करोडो रुपये गोळा केले व आपसात वाटून घेतले आहे.
गोरगरीब,कष्टकरी,जेष्ठ नागरीक,महिला भगिनींनी रात्रीचा दिवस करुन,रक्ताचे पाणी करुन आपल्या उज्वल भविष्यासाठी,अडीअडचणी साठी रक्कम साठवून ठेवली होती व अशा लोकांच्या कष्टाच्या पैशांवर या हरामखोरांनी डल्ला मारला,सहकार खात्याला मॅनेज करुन हे भामटे सुटले असे त्यांना वाटते.परंतु अजुन बरीच मोठी लढाई बाकी आहे व या लढाईत या सर्वाना योग्य शासन मिळेल व ठेवीदारांचा विजय नक्कीच होईल.आज दि.15 तारखेला सर्व ठेवीदारांनी आपल्यावर झालेल्या अत्याचारा विरुध्द संघटीतपणे लढा दयावयाचा आहे.सर्वांनी उपोषणात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष सुधिर भद्रे व कुमार डावखर तालुका अध्यक्ष भ्रष्टाचार विरोधीजन आंदोलनाच्या वतीने करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा