एसटी बस प्रवासात दिव्यांगांना युडीआयडी ओळखपत्र ग्राह्य धरण्याची मागणी. दिव्यांग क्रांती संघटनेचे निवेदन.


यावल दि.13
येथील एसटी आगारांमध्ये प्रहार दिव्यांग क्रांती सेनेच्या वतीने निवेदन देत दिव्यांग बांधवांना एसटी बस प्रवास भाडे सवलती करिता युडीआयडी ओळखपत्र ग्राह्य धरण्यात यावे व दिव्यांगांना निमआरम बस मध्ये देखील प्रवास सवलत मिळावी अशा मागणीचे निवेदन यावल आगार प्रमुख यांच्यासह विविध ठिकाणी पाठवण्यात आले.
    यावल एसटी आगारामध्ये माजी मंत्री बच्चू कडू,प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे जळगाव जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब पाटील व यावल तालुकाध्यक्ष मोहन सोनार यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले यात त्यांनी म्हटले आहे की,शासनाच्या परिपत्रकानुसार दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ च्या अनुषंगाने केंद्र शासनाने दिव्यांगांना दिलेल्या ओळखपत्र युडीआयडी कार्ड याला प्रवास सवलत साठी ग्राह्य धरणे आवश्यक असून सदर काडाद्वारे निमआराम बसेस मध्ये देखील दिव्यांगांना सवलत देण्यात यावी कारण दिव्यांग प्रवास करत असतांना त्यांना सवलत नाकारली जात आहे, अशा तक्रारी आल्या आहेत तेव्हा सदर कार्ड हे ओळखपत्र असून त्यावरूनच प्रवासाची सवलत देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे या मागणी सोबत शासन परिपत्रकाची कॉपी सुद्धा आगारात देण्यात आली आहे.सदर निवेदन स्थानक प्रमुख के.आर. वानखेडे यांच्या कडे देण्यात आले.या प्रसंगी दिव्यांग क्रांती संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दिनेश सैमीरे, तालुकाध्यक्ष मोहन सोनार, उपाध्यक्ष प्रदिप माळी,राहुल सावखेडकर,ऍड.गोविंद बारी,जितू कोळी,यावल शहराध्यक्ष जनार्दन फेगडे, शहारूख पटेल,सुकलाल धंजे,विश्वनाथ बारी,बाळु वाणी,पराग पवार,उत्तम कानडे,ज्ञानदेव धोबी,फिरोज पटेल,आश्विन चौधरी,पंडीत बारी,शरद बारजीभे,हेमचंद्र चौधरी,गीताबाई जोहरी, आरती जोहरी,गितांजली वारूळकर,आरेफाबी पटेल, प्रतिक्षा वाघ,वर्षा बारी, बिस्मिल्ला खान,शशीकांत वारूळकर,सैय्यद मुस्ताक, सागर गजरे,देविदास गजरे, नदीम खान,राजेश पाटील, महेश बारी,सलीम खान, चंद्रकांत जोहरी,प्रकाश झोपे, राजु धनगर,फारूख शेख, भगवान माळी,संतोष बारी, मंजर शेख,भास्कर बारी आदी दिव्यांग बांधव उपस्थित होते.
सलवत देण्याच्या दिल्या सुचना-
दिव्यांग बांधवांनी या पुढे युडीआयडी कार्ड दाखवल्यानंतर त्यांना प्रवासात सवलत दिली जाईल व तशा सुचना आपण आत्ताचं सर्व वाहकांना लेखी स्वरूपात देवू व दिव्यांगाना प्रवास सवलत देखील देण्यात येईल व या पुढे तक्रार येणार नाही अशी काळजी घेवु असे स्थानक प्रमुख के.आर.वानखेडे यांनी सांगीतले.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात