नवीन जोशात आलेल्या एका कापूस व्यापाऱ्याने (पुजों शेठ नव्हे ) तीन कॅन अंदाजे 90 लिटर क्षमतेचे एक क्विंटल वजन असलेल्या पाण्याच्या माध्यमातून एका शेतकऱ्याचा कापूस मोजताना मापात 'पाप' केल्याने त्या शेतकऱ्यांने आणि त्या व्यापाऱ्याने आप-आपसात तडजोड करून फसवणुकीच्या कृत्यावर पडदा टाकल्याने कोर्ट रोड पासून म्हसोबा रोड पर्यंत जोरदार चर्चा सुरू आहे.
कापूस मोजताना व्यापारी मापात पाप करीत असताना त्या सुज्ञ आणि सर्वांशी सलोख्याचे संबंध ठेवणाऱ्या शेतकऱ्याला माहीत झाल्यावर सुद्धा शेतकऱ्यांने त्या व्यापाऱ्याशी कोणत्या उद्देशाने आणि कशासाठी व का ? तडजोड केली हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होत असून तो कापूस व्यापारी पुन्हा इतर कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करताना मापात पाप करणार नाही का? याची जाणीव त्या शेतकऱ्यांला का झाली नाही? इत्यादी अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यापुढे तो कापूस व्यापारी कुठेही कापूस खरेदीसाठी गेल्यास त्यावर इतरत्र दोन-तीन जण त्याच्यावर पाळत ठेवून त्याचे मापात पाप करण्याचे कृत्य उघडकीस आणणार असल्याचे सुद्धा बोलले जात असून त्या व्यापाऱ्याचे नाव एका सुज्ञ नागरिकातर्फे बाजार समिती आणि गुन्हे अन्वेषण विभागाकडे लिखित स्वरूपात दिले गेले असल्याचे बोलले जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा