महाराष्ट्र ज्युनिअर शूटिंग हॉलीबॉल संघात यावल येथील 'योगेश देवरे' याची निवड.




यावल दि.27
 यावल येथील शूटिंग हॉलीबॉलचा खेळाडू योगेश प्रमोद देवरे याची नुकतीच महाराष्ट्र ज्युनियर शूटिंग हॉलीबॉल संघात निवड झाली.
         मारूळ येथे जळगाव जिल्हा शूटिंग हॉलीबॉल निवड चाचणी दि. 20 नोव्हेंबर 2022 रोजी घेण्यात आली.त्यात यावल येथील योगेश देवरे यांची जळगाव जिल्हा शूटिंग हॉलीबॉल संघात निवड करण्यात आली, त्यानंतर दि.24 व 25 डिसेंबर रोजी महाराष्ट्र शूटिंग हॉलीबॉल निवड चाचणी स्पर्धा उस्मानाबाद येथे घेण्यात आली त्यात योगेश देवरे यांने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले त्यामुळे त्याची महाराष्ट्र शूटिंग हॉलीबॉल संघात निवड करण्यात आली.
        योगेश देवरे याची महाराष्ट्र ज्युनिअर शूटिंग हॉलीबॉल संघात निवड झाल्याने महाराष्ट्र शूटिंग हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष व क्रीडामंत्री मा.ना.गिरीश भाऊ महाजन,सेक्रेटरी के.आर.ठाकरे सर,उपाध्यक्ष अशोकभाऊ चौधरी, अशोक तायडे,नईम सर,अनिस पटेल,हरीश खाचणे,अरुण चौधरी यांनी कौतुक व अभिनंदन केले.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात