६ डिसेंबर डाॅ आंबेडकर परिनिर्वाण दिवस अभिवादन..



शतक  लोटले  तरी
झळाळे  सूर्य  निळा
दिले  दिवस सुखाचे
सोसल्या तूचं  कळा

भाकरी पेक्षा अधिक 
पुस्तकांचा तव लळा
शिक्षण  मिळो  सर्वां
परिवर्तनां  कळवळा

धम्म  चक्र प्रवर्तनाने
खुले मार्ग नव वेगळा
संविधान  दिले  देशा
प्रगत भारत आगळा 

ते पहिले कायदामंत्री
नियम  सगळे  पाळा
निर्बंध  उठले  तरीही
गर्दी गोंधळास  टाळा 

तू  प्राणवायू समाजा
श्वासआमचा मोकळा
जाती पाती पलीकडे
प्राण प्रिय  तू सकळा

अस्तित्वाची जाणीव
राहे जागे जळास्थळा
शतशः नमन  सलाम 
निळ्या सुखी वादळा

- हेमंत मुसरीफ पुणे. 
  9730306996.
  www.kavyakusum.com

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात